Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भीतीच्या छायेने जखडल्या बालविवाहाच्या बेड्या; ठाण्यात ५ वर्षांत ‘इतके’ बालविवाह रोखले, मुरबाडमध्ये सर्वाधिक घटना

14

जान्हवी पाटील, ठाणे : लग्न ठरले, सुपारी फुटली, दोघांना हळदीही लागल्या… मात्र, काही जागरुक नागरिकांच्या सर्तकतेमुळे ठाणे जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत ३७ बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. तर करोनानंतर हे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत असून, अवघ्या सहा महिन्यांत १५ बालविवाह रोखले गेले आहेत. सर्वाधिक बालविवाहांचे प्रमाण हे मुरबाड तालुक्यात असल्याचे समोर आले आहे. मात्र, यासह छुप्यापद्धतीने होणाऱ्या बालविवाहांचे प्रमाणही तुलनेत अधिक आहे. सध्याच्या स्थितीत मुलींची असुरक्षितता, शिक्षण व हुंड्यासाठी होणारा खर्च यामुळे ठाणे जिल्ह्यात बालविवाहांचे प्रमाण दिवसागणित वाढत आहे.कोलकातामधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेला बलात्कार असो वा दोन दिवसांपूर्वीची बदलापूरमधील लहान मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना… अशा असुरक्षित वातावरणामुळे पालकांच्या मनात मुलींबद्दल भीतीचे वातावरण आहे. मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने आजही शहापूर, मुरबाड परिसरातील मुलींना नववीनंतर शिकवले जात नाही, हे आजचे वास्तव आहे. तर शाळा गावापासून १ ते २ कि.मी अंतरावर असली, तरी अशा परिसरातील मुलींच्या गळतीचे प्रमाणही ही असुरक्षा अधिक अधोरखित करते. रूढी परंपरांबरोबरच असुरक्षिततेमुळे ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक बालविवाह हे ग्रामीण परिसरात असल्याचे अहवालावरून समोर आले आहे.

बालविवाह करण्यासाठी लोकांनी या कायद्याच्या अनेक पळवाटा शोधल्यामुळे गेल्या दोन ते तीन वर्षांत बालविवाहाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. गेल्या सहा महिन्यांत जे १५ बालविवाह रोखण्यात आले, त्यामध्ये सर्वाधिक मुरबाड तालुक्यात आठ बालविवाह रोखल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर शहापूर आणि भिवंडीचा क्रमांक लागतो.

वर्ष उघडकीस आलेले बालविवाह

२०२० ०४
२०२१ ०८
२०२२ ०४
२०२३ ०६
२०२४ जूनअखेर १५
एकूण ३७

‘ठाणे अंतर्गत मेट्रो’ला केंद्र सरकारची मान्यता, मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश
बालविवाह रोखण्यासाठी हेल्पलाइन

जिल्ह्यात कुठेही बालविवाह होत असल्यास, ते रोखण्यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयाच्या वतीने चाइल्ड लाइन ही संस्था काम करत आहे. ० ते १८ वयोगटातील मुलांवर अन्याय होत असल्यास १०९८ या क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन जिल्हा बालसंरक्षण विभागाने केले आहे.

छुप्प्यापद्धतीने अनेक बालविवाह

महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ठाणे जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत ३७ बालविवाह रोखण्यात आले. मात्र, यासह ग्रामीण परिसरात अनेक बालविवाह छुप्या पद्धतीने होत असून, त्याची आकडेवारी निश्चितच भुवया उंचावणारी असेल, असे सामाजिक कार्यकर्ते सांगतात.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.