Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Rahul Desai : कोल्हापुरात भाजपला मोठा धक्का! जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी दिला राजीनामा

14

कोल्हापूर : २०२४ च्या लोकसभा निवडणुका पार पडल्या असून लवकरच विधानसभा निवडणकांचे बिगुल वाजणार आहे. सर्वच राजकीय पक्षांकडून त्या संदर्भातील तयारी सुरू झाली आहे.अशातच कोल्हापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आपले राजीनामापत्र ई-मेलद्वारे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल देसाई यांनी राजीनामा दिल्यामुळे कोल्हापुरात भाजपचे मोठे नुकसान झाले आहे.

विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारी सुरू

राहुल देसाई हे भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष असून त्यांनी राधानगरी भुदरगड विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.सध्याचे शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी राहुल देसाई यांनी सुरू केली आहे. परंतु पक्षाकडून तिकीट मिळणार नसल्याची माहिती मिळताच त्यांनी भाजपा सोडण्याचा निर्णय घेतला.
Badlapur Assault Case FIR : दादाने माझे कपडे काढले नि… घाबरलेल्या चिमुकलीने पालकांना सांगितलं, बदलापूर प्रकरणी FIR मध्ये काय?

समरजितसिंह घाटगे हे देखील भाजप सोडण्याच्या वाटेवर

राहुल देसाई यांच्या पाठोपाठ कागल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे हे देखील पक्ष सोडण्याच्या वाटेवर आहेत. समरजितसिंह यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली .तर दुसरीकडे शरद पवारांची देखील भेट घेतली आहे. त्यामुळे आता समरजितसिंह घाटगे हे देखील पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे.

राहुल देसाई पक्षावर नाराज नाही

या सर्व घडामोडींवर भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ” राहुल देसाई ही पक्षावर नाराज नाहीत, त्यांना मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे”. असं महाडिक म्हणाले आहेत.

दरम्यान, दिवाळीनंतर राज्यात विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांनी आपली कंबर कसण्यास सुरवात केली आहे. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं आहे.त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळवण्याच्या तयारीत आहे. तर महायुती झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.