Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे महापालिकेच्या राजीव गांधी ई लर्निंग स्कुलच्या वार्धापन दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे बोलत होत्या. राज्याला गृहराज्यमंत्री नाही आणि आपले गृहमंत्री कायम दिल्लीला असतात. त्यामुळे कारभार कोण पाहाते माहित नाही, पण हे जास्त दिवस आपल्याला सहन करायचे नाही 2-3 महिन्यात हे बदलेल असे, सुप्रिया सुळे म्हणाल्या.
परवा बदलापूरमध्ये जी घटना घडली त्याचा आपण जाहीर निषेध केला पाहिजे. या घटनेबाबत सर्वांनी संवेदनशीलपणाने बोलायला हवे. तंत्रज्ञानबरोबार मुलीच नाही तर मुलांना देखील गुड टच बॅड टचचा प्रोग्राम घ्यायला हवा. हा सामाजिक प्रश्न आहे, मी म्हणत नाही यात प्रत्येकवेळी सरकार दोषी असेल पण सत्तेत असलेल्या लोकांनी नैतिकता दाखवायला हवी ते आम्हाला नेहमी नैतिकता शिकवतात, असे देखील सुळे म्हणाल्या.
आपलं सरकार आल्यावर मंच्यावर बसलेल्या पैकी मंत्री होतील
हा कार्यक्रम माजी उपमहापौर आणि काँग्रेस नेते आबा बागुल यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी मंत्री रमेश बागवे आणि स्वतः आबा बागुल उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांचे भाषण सुरू असताना हे सर्व मान्यवर मंचावर बसलेले होते. या सगळ्यांकडे पाहत सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी तुम्हाला शब्द देते महाविकास आघाडी सरकार आल्यावर मंचावर बसलेल्यापैकी काही मंत्री होतील. तेव्हा माझ्या मतदारसंघातील काम तुम्ही कराल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मंचवरील इच्छुकांच्या मनामध्ये आनंदाची उकळी फुटली होती.
आबा बागुल यांची प्रोग्राम डिप्लोमसी
आबा बागुल हे सहा टर्म पुणे महापालिकेचे नगरसेवक राहिलेले आहेत. आता त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याचे वेध लागले आहेत. मात्र महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने या जागेवरून आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आबा बागुल यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी काँग्रेससह आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील लॉबिंग करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आबा बागुल यांनी आपल्या या कार्यक्रमाला थेट सुप्रिया सुळे यांना निमंत्रण दिल. आता आबा बागुल यांचं तिकीट मिळवण्यासाठी सुरू असलेली ही प्रोग्राम डिप्लोमसी शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.