Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

कदम आणि चव्हाणांच्या वादाचे देणेघेणे नाही, मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा; वैभव नाईकांची मागणी

7

सिंधुदुर्ग, अनंत पाताडे : रवींद्र चव्हाण कोकणातले मंत्री आहेत, त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा आहेत. परंतु त्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे मुंबई गोवा महामार्ग पूर्ण न झाल्यामुळे चाकरमानी, पर्यटक, व्यावसायिक सगळ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. अपूर्ण अवस्थेत असलेल्या महामार्गाचा तोटा सिंधुदुर्गाला होत आहे. गतवर्षीच्या गणेशोत्सवात हाच महामार्ग पूर्ण करण्याचे आश्वासन रविंद्र चव्हाण यांनी दिले होते. रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम याच दोन नेत्यांमध्ये काय वाद आहे यात आम्हाला किंवा कोकणातील जनतेला काही देणेघेणे नाही. लवकरात लवकर महामार्ग सुरू झाला पाहिजे,अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.

ज्याप्रमाणे दोन नेते एकमेकांवर आरोप करत आहेत त्यावरून युतीच्या दोन पक्षात आणि सरकारमध्ये एकवाक्यता नाही, हेच पुन्हा एकदा दिसून येत आहे. सरकारमध्ये एक वाक्यता नसल्यामुळे कोकणचा विकास त्यांच्याकडून होऊ शकत नाही. निवडणुकीत कोकणामध्ये पैसे वाटप करून आणि लोकांची दिशाभूल केल्याने युतीला विजय मिळाला आहे. आता मात्र कोकणची जनता सुज्ञ झाली आहे, जनता याचा नक्कीच अभ्यास करेल. विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनता पुन्हा एकदा शिवसेनेच्या पाठीशी राहील असा विश्वास आमदार वैभव नाईक यांनी व्यक्त केला.
Ramdas Kadam vs Ravindra Chavan : तोंड सांभाळून बोला, नाहीतर तोंड फोडू; रामदास कदम यांच्या ‘कुचकामी’ टीकेवर रवींद्र चव्हाण यांचा इशारा

रवींद्र चव्हाण आणि रामदास कदम वाद काय?

चमकोगिरी करणारे कुचकामी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यायला हवा, असा ‘घरचा आहेर’ महायुतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना नेते रामदास कदम यांनी दिला होता. मुंबई गोवा हायवेचं बांधकाम रखडल्याबद्दल संताप व्यक्त करताना कदमांनी चव्हाणांवर निशाणा साधला होता. यावर प्रतिक्रिया देताना चव्हाणांनी त्यांना अडाणी संबोधलं आहे. तोंड सांभाळून बोलायचं नाही तर तोंड फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराच चव्हाणांनी दिला.

अशातच आता कोकणात गेले १७ वर्षे चाललेला मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्णत्वास जात नाही, तोपर्यंत नवीन महामार्गाचे काम सुरू होऊ देणार नाही ग्रीन फील्ड हायवे उभारण्याच्या प्रक्रियेलाही आमचा विरोध राहील, अशी भूमिका जनआक्रोश समिती आणि समृद्ध कोकण संघटनेचे संजय यादवराव यांनी घेतली आहे. यामुळे बहुचर्चित ग्रीन फील्ड हायवे सुद्धा वादाच्या भोवऱ्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.