Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Vidhan Sabha : सेटिंग करुन पैसे कमविण्यासाठी तिकीट देणार नाही, राज ठाकरेंचा इच्छुक उमेदवारांना इशारा

9

म. टा. वृत्तसेवा, गोंदिया : पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शेवटच्या माणसापर्यंत पोहचणे आवश्यक आहे. हे गेल्या १९ वर्षांत गोंदिया जिल्ह्यात झाल्याचे दिसत नाही. पुढील दोन महिन्यांत जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, शाखाध्यक्ष, गट अध्यक्ष इथपर्यंत तुमची यंत्रणा गेलेली दिसून आली तरच चारही विधानसभा लढवणार. इतर पक्षांकडून सेटिंग करून पैसे कमवायला कुणालाही निवडणुकीची तिकीट देणार नाही, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा बुधवारी गोंदिया शहरातील ग्रँड फिता हॉटेलात झाला. यात मार्गदर्शन करताना राज बोलत होते. व्यासपीठावर मनसेचे युवा नेते अमित ठाकरे, गोंदिया जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे, तालुका अध्यक्ष मुकेश मिश्रा आदी उपस्थित होते.
Badlapur School Case : बहिणींना पैसे देऊन ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे का याचा विचार करा, राज ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल

राज ठाकरे म्हणाले, आज प्रशासनाचा धाक गुन्हेगारांवर राहिलेला नाही. त्यामुळेच पश्चिम बंगालच्या कोलकाता आणि महाराष्ट्रातील बदलापूरसारख्या घटना घडताना दिसतात. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना प्रशासनासाठी लाजिरवाणी बाब आहे. निगरगट्ट प्रशासनामुळे संपूर्ण देशात महाराष्ट्राची बदनामी होत आहे. येथील शासनाला याचे काहीही सोयरसुतक राहिलेले नाही, असे दिसते आहे. एक एसआयटी नेमून दिली, जलदगती न्यायालयात प्रकरण दाखल केले की झाले मोकळे, अशाप्रकारे शासन व्यवस्था चालते काय? आज महाराष्ट्रातील राजकारणाचा विचका करून ठेवला आहे. एका-एका आमदारांवर ५० खोके घेऊन स्वतःला विकल्या गेल्याचे आरोप होत आहेत. यापूर्वी महाराष्ट्रात हे कधीही ऐकायला मिळत नव्हते, असेही राज म्हणाले.

मनसेचे विचार गोंदिया जिल्ह्यातील गावोगावी, घराघरापर्यंत पोहोचविण्याकरिता प्रत्येक मनसैनिकांना आजपासूनच सज्ज व्हावे लागणार आहे. पुढील १५ नोव्हेंबरपर्यंत निवडणुका अपेक्षित असल्यामुळे वेळ कमी उरला आहे. या कमी वेळातच अधिक गतीने प्रत्येक मनसैनिकाला धाव घ्यावी लागणार. आपण पुढील दोन महिन्यांत केलेल्या कर्तबगारीमुळे यशापर्यंत पोहोचलो नाही तरी जवळपास पोहोचू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.