Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सुषमा अंधारे प्रतिक्रिया….
राज्यात साडे सात वर्षापासून गृहमंत्री देेवेंद्र फडणवीस आहेत. या राज्यात महिला अत्याचाराच रेट जास्त असल्याने महिला अत्याचारावरील श्वेत पत्रिका त्यांनी काढावी अशी मागणी उद्धव सेनेच्या सेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. वामन म्हात्रे हे शिंदे गटाचे आहेत, मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आहे. यामुळे एका महिला पत्रकाराविषयी असे वक्तव्य करून आंदोलन अधिक चिघळवण्याचा प्रयत्न करून सुद्धा वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून पोलिसांवर दबाव आहे का ? असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या अंधारे यांनी केला आहे. वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून सुषमा अंधारे या दुपारपासून बदलापूर पूर्व स्थानकात ठिय्या मांडून बसल्या आहेत. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे आरोप केले आहेत.
जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया…
पाेलिस जी घटना घडलेली नाही. त्या प्रकरणात गुन्हे दाखल करतात. तर जे गुन्हे घडले त्या प्रकरणी गुन्हा दाखल करीत नाही. हे बदलापूर प्रकरणातून उघड झाले आहे. गुन्हे नोंदवू का यासाठी पाेलिसांवर दबाब येताे. वरुन फाेन येतो. तो कोणत्या इंद्रदेवाचा फोन येतो का ? वरनं परवानी आली नाही तर गुन्हा दाखल करणार नाही का ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. घटनाच इतकी नींदनीय होती. नागरीकांनी उत्स्फूर्तपणे आंदोलन केले. या आंदोलनात बाहेरचे लोक होते असे बोलले जाते. हे खाेटे आहे. बदलापूरकर सांगतात. ते स्वत: आंदोलनात होते. आम्हाला लाडकी बहिण नको, सुरक्षीत बहिण ही योजना हवी आहे असे आव्हाड यांनी सांगितले.
नाना पाटोले यांची प्रतिक्रिया…
कालचे आंदोलन हे बदलापूरकरांचे नव्हते. तर संपूर्ण महाराष्ट्राला जागरुक करणारे आंदोलन ठरले. मात्र सरकार या आंदोलनाला राजकीय स्वरुप देण्याचा प्रयत्न करीत आहे. या आंदोलनात बदलापूरकर उत्फूर्त पणे सहभागी झाले होते. त्यांची काेणतीही चूक नव्हते. पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आंदोलकांनी दगडफेक केली. या आंदोलकावरील दाखल करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावेत. जननेते नींदनीय घटनेचा साधा निषेध व्यक्त करायचा की नाही असा संतप्त सवाल काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपस्थित केला आहे.
राजू पाटील यांची प्रतिक्रिया…
शक्ती कायदावरुन मनसेचे आमदार राजू पाटील यांनी थेट सरकारला खडेबोल सुनावले आहे. आमदार राजू पाटील म्हणाले, झालेली घटना अतिशय दुर्देवी आहे. नराधमांना कठोरातील शिक्षा व्हावी अन्यथा अशा प्रकरणाला आळा बसणार नाही. आंध्रप्रदेशच्या धर्तीवर राज्यात महिलांसाठी शक्ती कायदा लागू करा. आता तरी सरकारला जाग आली असले शक्ती कायदा फाईल दिल्लीत पडून आहे, तो त्वरित पारित करून घ्यावा अशी थेट मागणी राजू पाटील यांनी सरकारला केली आहे. विधानसभेत शक्ती कायद्यासाठी मी बोललो आहे असे राजू पाटील यांनी माहिती दिली.
वामन म्हात्रे प्रतिक्रिया…
मी संबंधित महिला पत्रकाराच्या बाबतीत कोणतेही अपशब्द काढलेले नाहीत. केवळ आणि केवळ मला बदनाम करण्यासाठी राजकीय स्टंटबाजी सुरु आहे. मी कोणत्याही प्रकारचे असे अपशब्द वापरलेले नाहीत. पोलिसांनी देखील याबाबत तपास करून निर्णय घ्यावा. माझ्या बाजूने देखील कायदेशीर पद्धतीने उत्तर देण्यात येईल. असे स्पष्टीकरण शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिले आहे. तर उबाठा गटाकडून याचे राजकारण केले जात असल्याचा आरोप ही वामन म्हात्रे यांनी केला आहे.
शंभूराजे देसाई यांची प्रतिक्रिया…
पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितले की, बदलापूर प्रकरणातील आरोपीला अटक केली आहे. आराेपीला पोलिस कोठडी मिळाली आहे. आरोपी हा शाळेतील खाजगी कर्मचारी हाेता. त्याला शाळेने नियुक्त केलेले नव्हते. शाळा, का’लेज, हा’टेलमध्ये खाजगी कर्मचारी नियुक्त करताना त्यांची पोलिस पडताळणी करावी. शाळेत सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध झाले नाही. हा शाळेचा हलगर्जी पणा असून या प्रकरणी मुख्याध्यापक आणि शिक्षक यांचे निलंबन करण्यात आले आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालविले जाणार आहे. या प्रकरणी एसआयटी अधिकारी आर. पी. सिंग यांची नियुक्ती केली आहे . आराेपीला फाशी होईल यासाठी सर्व बाबी न्यायालयात मांडल्या जातील. बदलापूर आंदोलनात स्थानिक नागरीक नव्हते. त्यांच्या हातात लाडकी बहिण योजनेचे बॅनर होते. त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे. पोलिसांवर दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरु आहे. आंदोलकांना पांगविण्यासाठी पाेलिसांना नाईलाजास्तव लाठीचार्ज करावा लागला.
तृप्ती देसाई यांची प्रतिक्रिया…
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी सांगितले की, दिशा कायदा आपल्याकडे लागू असला तरी बदलापूरातील घटनेने या महाराष्ट्राची दिशाच बदलून टाकली आहे. त्यामुळे केवळ श्रेय लाटण्याकरीता कायदा लागू करायचा. त्याची अंमलबजावणी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून केली जाणार नसेल तर त्याचा उपयाेग काय ? एखादी गंभीर घटना घडल्यावर शाळेत सीसीटीव्ही लावा, त्याच्या तपासाकरीता एसआयटी स्थापन केली. घटना घडून गेल्यावर या सगळ्या गोष्टीचा काही उपयोग नाही. याचा सरकारने विचार करावा.
रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया…
ही घटना घडली ती संतापजनक आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत. या घटनेच्या निषेधार्थ जे आंदोलन झाले. त्या आंदोलकांच्या हाती लाडक्या बहिणीचे ब’नर कसे काय आले. या आंदोलनात बाहेचे लोक होते. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित होते. घटनेकडे सगळेजण राजकारण म्हणून पाहत आहे. हे घटनेचे राजकारण होता कामा नये. पिडीत मुलीला आणि पालकांना समुदेशन केले आहे. त्यांच्या कुटुंबियांना मनोधैर्य योजने अंतर्गत मदत करण्यात आली आहे. पिडीत मुलीच्या कुटुंबियांना मदत करणे या गोष्टी बाजूला राहून त्याचे राजकारण केले जात असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया..
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्याचप्रमाणे या घटनेचं वार्तांकन करणाऱ्या महिला पत्रकाराविषयी अर्वाच्च भाषा वापरणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृ्त्वातील शिवसेनेचे नेते वामन म्हात्रे यांच्यावरही चित्रा वाघ यांनी भाष्य केलं आहे. ‘तू अशा बातम्या देतेस, जणू तुझ्यावरच बलात्कार झाला आहे’ अशी बेताल टिपण्णी म्हात्रेंनी केली होती. यावर बोलताना “तिथल्या तिथे त्याचं थोबाड का नाही फोडलं?” असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला. मला हा मुद्दा आता समजला, गुन्हा का नोंद होत नाही याविषयी मी पोलिसांशी बोलते, पण मला असं वाटतं, की कोणीही असूदे, ज्यावेळी असं आपल्याला कुणी बोलतं, तुम्ही का नाही त्याचं थोबाड फोडलं? तिथल्या तिथे थोबाड फोडायला पाहिजे होतं. एवढं ऐकून घेईपर्यंत… मी जर काम करत असताना, मला जर कोणी बोलणार असेल, तर तो कोण आहे, हे मी बघणार नाही हो.. ज्या पद्धतीने आपल्याला असं बोललं जातंय, पोलिसांनी गुन्हा नोंद करायलाच पाहिजे, पण एक महिला म्हणून… सगळ्या ठिकाणी पोलीस पोलीस पोलीस करुन कसं जमेल.. मी सक्षम आहे ना.. मी पत्रकार आहे, मी राजकीय कार्यकर्ती आहे.. मला जर कोणी बोललं तर मी तिथल्या तिथे त्याचं थोबाड फोडेन आणि मग पोलिसांना सांगेन आता करायचं ते करा..” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
संजय निरुपम यांची प्रतिक्रिया…
आरोपीने निष्पाप मुलींसोबत केलेली घटना अत्यंत अशोभनीय व दुष्ट आहे, राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री या प्रकरणी गंभीर असून, आरोपीला अटक करून गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारने आरोपींचा बचाव केला असता तर तो मुद्दा बनला असता. विरोधक मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत राजकारण करत आहेत, तर अशा संवेदनशील विषयात असे करणे योग्य नाही. – संजय निरुपम (प्रवक्ते व माजी खासदार – शिवसेना शिंदे)