Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बदलापूर प्रकरणाचे राज्यात पडसाद, छ. संभाजीनगर पेटलं, आरोपीला कठोर शिक्षेची मागणी

7

वाळूज महानगर : बदलापूर येथे एका शाळेतील चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करून बुधवारी वाळूज महानगर येथे निदर्शने करण्यात आली. येथील प्रताप चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नराधम आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करून घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने केली. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असून, घटना घडून बारा तास उलटल्यानंतर गुन्हा दाखल केला गेला नाही. त्यामुळे लोक रस्त्यावर उतरले.
Badlapur Case :सुरक्षेसाठी महिलांना कोयता वापरण्याची परवानगी द्या! ठाकरे गटाची मागणी
त्यानंतर झोपलेल्या सरकारला जाग आली ज्या शाळेत घटना घडली ती भाजप पदाधिकाऱ्यांची असल्याने सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला.पश्चिम तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वात निदर्शने करण्यात आली. यावेळी चेतन कांबळे, अरविंद धिवर, सागर शिंदे, बाळासाहेब कार्ले, सचिन गरड, विष्णू जाधव, विशाल खंडागळे, कैलास भोकरे, लक्ष्मण लांडे, विजय सरकटे, गणेश सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
त्या नराधमाला शिवरायांच्या काळातील ‘चौरंग’ शिक्षा द्या…बदलापूर प्रकरणावर रितेश देशमुखचा संताप

गंगापुरात तहसीलदारांना निवेदन

बदलापूर अत्याचारप्रकरणातील दोषी आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा देऊन घटनेची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या महिला आघाडीने निवेदनात केली आहे. या वेळी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष तारा पदार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार गौरव खैरनार यांची भेट घेऊन शासनाला निवेदन सादर केले. ‘चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला गफाशीची शिक्षा द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. घटना घडली तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जिल्हा असून, ते जिल्ह्यात दौऱ्यावर असताना पोलिसांनी घटना दाबण्याचा प्रयत्न केला,’ असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा.
Latur News : बदलापूर, पुण्यानंतर लातुरमध्ये साडेचार वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून सर्व दोषी आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी आरोपींना पाठीशी घालणाऱ्या पोलीस अधिकारी यांनादेखील या प्रकरणात सहआरोपी करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. सर्व शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची सक्ती करून प्रत्येक पालकांना पाल्याचे शाळेतील अपडेट मोबाइलवर पाहता येईल अशी शासनाच्या वतीने व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. कावेरी पाटील, पूजा पाटील, रुक्मिणी नवले, वंदना साळुंखे, भिमाबाई दुशिंग, शोभा साळवे, तबसूम सय्यद, वाल्मिक शिरसाठ, अहमद पटेल, महिंद्र राऊत, अनिस कुरेशी, एकनाथ सातपुते, रफिक पटेल, संतोष पदार, युसुफ बागवान, अब्बास बागवान, वैभव लोखंडे आदींची उपस्थिती होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.