Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
इंदापूरचे माजी आमदार व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे तुतारीच्या चिन्हावर लढतील का..? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता सुप्रिया सुळेंनी त्याला बगल दिली. मात्र हर्षवर्धन भाऊ आणि आमचे सहा दशकाचे संबंध आहेत. त्यांनी हे संस्कार जपले आहेत. शंकराव भाऊ पासून आमच्या कुटुंबाचे संबंध कायम राहिले ते भाजपमध्ये असले तरी देखील हे प्रेमाचे नाते ते जपतात आणि मी ही आयुष्यभर ते जपणार आहे. असे म्हणत त्यांनी हर्षवर्धन पाटलांच्या संबंधित राजकीय प्रवासाविषयी काही वक्तव्य केले नाही.मात्र त्यांच्याविषयी आस्था प्रकट केली.अजून महाविकास आघाडीतील जागा वाटप व्हायचे आहे.त्यामुळे इंदापूरची जागा नेमकी कोणाकडे जाणार हे अजून नक्की नाही. येत्या पंधरा दिवसात आम्ही इंदापूरच्या जागेविषयी उमेदवारासह नाव जाहीर करू, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
बरे झाले पियुष गोएलांनी आरसा दाखवला
जीएसटी संदर्भातील प्रश्नावरून पियुष गोयल यांनी आज एका वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखावरून सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील पत्रकार परिषदेत केंद्र सरकारवर टीका केली. त्या म्हणाल्या, बरे झाले पियुष गोयलांनीच केंद्र सरकारला आरसा दाखवला. गेली दहा वर्षे आम्ही जीएसटी संदर्भात सातत्याने सांगत होतो. ऑनलाईन व्यवहाराबद्दल सांगत होतो.ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट आणि इतर ही कंपन्या सातत्याने ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून देशातील व राज्यातील व्यवसायिकांचे व्यवसाय संपवत आहेत. मोठ्या प्रमाणावर आर्थिक नाकाबंदी करत आहेत. याविषयी आम्ही सातत्याने सांगत होतो.
आज पियुष गोयलांनी दहा वर्षानंतर ही गोष्ट सांगितली. त्या कारनाने बरे झाले. खरे तर आम्ही सांगत असताना पियुष गोयलच नाही. तर सरकारमधील लोक सांगायचे की आम्ही खूप जुनी भाषा बोलत आहोत.पण आम्ही जुनी भाषा बोलत नव्हतो.लोकांच्या मनातील भाषा व त्यांच्या वेदना सांगत होतो. मात्र पियुष गोयल यांनी ते प्रकट करणे हे जरा महत्त्वाचेच आहे असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.