Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी धनीराम वासनिक हा नागपुरातील कामठी परिसरात राहतो. पीडित मुलगी त्याच्या शेजारी राहते. आरोपीने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवले. यानंतर तो पीडित मुलीला आपल्या घरी घेऊन गेला. येथे त्याने तिला चॉकलेट देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केला. त्यानंतर ती मुलगी घाबरली आणि रडायला लागली. मुलगी रडत असल्याचे पाहून आरोपीने यानंतर मुलीला चाकूचा धाक दाखवत हा प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.
त्यानंतर पीडित मुलगी घाबरली आणि तिथून पळून आपल्या घरी गेली. यानंतर मुलीने आईला आपल्या सोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर मुलीच्या आईने तात्काळ आपल्या मुलीसह पोलीस ठाणे गाठले. तसेच पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगितला. जुनी कामठी पोलिसांनी घटनेची दखल घेतली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिताच्या पॉक्सो कलम ८, १२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी आदेश वासनिकला त्याचा घरी जाऊन अटक केली.
अजनीमध्ये महिलेचा विनयभंग
दुसरीकडे आणखी एका घटनेत नागपूरच्या अजनी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाची घटना घडली आहे. जिथे वैधमापन विभागाच्या उपनियंत्रक पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने एका महिलेचा विनयभंग केला. अजनी पोलिसांनी त्या अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. विजय झोटे (५७) असे आरोपी उपनियंत्रकाचे नाव आहे. तक्रारदाराचे पती वजनमाप दुरुस्ती आणि मशिनरी निर्मितीचे काम करतात. ७ ऑगस्ट रोजी विजय झोटे याने महिलेच्या पतीला फोनवरून शिवीगाळ केली. त्यामुळे तो तणावाखाली होता. ८ ऑगस्ट रोजी झोटे आणि त्याचे दोन साथीदार महिलेच्या घरी आले. झोटे यांनी केलेल्या अपमानामुळे महिलेचा पती तणावाखाली असल्याचे महिलेने सांगितले.
यानंतर झोटे याने काम न करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने महिलेचा पतीचा हात पकडून कार्यशाळाच्या बाहेर ओढत नेले. त्यानंतर महिलेने विरोध केले असता आरोपीने महिलेचा हात पकडून अश्लील चाळे करत महिलेचा विनयभंग केला. त्यानंतर महिलेने आरोपीविरुद्ध अजनी पोलिसांत विनयभंगाची तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी झोटे यांचा विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.