Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Atal Setu : अटल सेतूवरुन महिलेची उडी, ड्रायव्हरने तिचे केस पकडले आणि…१६ सेकंदात काय घडलं? सांगितला संपूर्ण घटनाक्रम

9

मुंबई : मुंबई – नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरुन आतापर्यंत काही जणांनी आत्महत्या केल्याची प्रकरणं समोर आली आहेत. १६ ऑगस्ट रोजी देखील एक महिला अटल सेतूवरुन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होती. मात्र अगदी काही सेकंदांमुळे तिचा जीव वाचवण्यात आला. १६ ऑगस्टच्या संध्याकाळी ७ वाजून ५ मिनिटं ते ७ वाजून ६ मिनिटांदरम्यान शेवटच्या क्षणी संजय यादव नावाच्या व्यक्तीने या समुद्री मार्गावरुन खाली पडणाऱ्या महिलेल्या वाचवलं. जोपर्यंत ट्रॅफिक पोलीस महिलेला पकडण्यासाठी पोहोचत होते, त्या १६ सेकंदापर्यंत तो महिलेला पकडून होता.

महिलेचा अटल सेतूवरुन जाण्याचा आग्रह

३१ वर्षीय संजय यादवसाठी तो नेहमीप्रमाणेच सामान्य दिवस होता. तो कॅब ड्रायव्हर आहे. तो ठाण्यात इतर चार लोकांसोबत एका खोलीत शेअर करुन राहतो. तो नेहमीप्रमाणे पांढऱ्या रंगाचं शर्ट घालून सकाळी ९ वाजता कामासाठी घरातून निघाला होता. त्याला थोडीही कल्पना नव्हती, की या २४ तासांत तो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरेल.

दुपारी ३ वाजेपर्यंत संजय यादवने ३ ते ४ राईड पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर त्याला त्याच्या रुममेटचा कॉल आला. तोदेखील ड्रायव्हर आहे. त्याच्याकडे आधीच एक राईड असल्याने त्याने संजय यादवला एका महिला प्रवाशाला सोडण्यासाठी बोलावलं.

५७ वर्षीय महिला मुलुंडमध्ये राहत होती. तिन ड्रायव्हर संजय यादवकडे अटल सेतूवरुन जाण्याचा आग्रह धरला. देवांचे फोटो विसर्जित करण्यासाठी तिने अटल सेतूवरुन जाण्याचं सांगितलं. संजय यादवने त्या महिलेला दुसऱ्या मार्गाने जाण्याचं सांगितलं, कारण अटल सेतूवर कारला थांबण्याची परवानगी नाही. पण महिलेने तिला अटल सेतूवरुनच जाण्याचा आग्रह धरला आणि ५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागणार नसल्याचंही ती म्हणाली.
Atal Setu News : अटल सेतूवर कार थांबवली, गाडीतून उतरला, आजूबाजूला कुठेही न पाहता थेट समुद्रात उडी; तरुणाने आयुष्य संपवलं

प्रवासात ड्रायव्हरशी चर्चा

महिला संजय यादवशी प्रवासात गप्पा मारत होती. ती त्याला त्याच्या कुटुंबाबाबत तसंच इतर काही गोष्टी विचारत होती. ते संध्याकाळी ७ च्या सुमारास अटल सेतूवर आले. महिलेने ड्रायव्हरला लवकरात लवकर कार थांबवण्याचं सांगितलं. महिलेने कार एका अशा ठिकाणी थांबवण्यास सांगितलं, जिथे तिला ती काय करते हे कोणी पाहू शकत नाही. त्यानंतर संजय यादवने शेलघर टोल प्लाजाजवळ गाडी थांबवली आणि महिलेला लगेच देवांचे फोटो विसर्जन करण्यास सांगितलं.

पुलावर चढली महिला

संजय यादवने सांगितलं, की महिला थेट पुलाच्या क्रॅश बॅरियरवर चढली आणि एक-एक करुन देवांचे फोटो विसर्जित करत होती. यावेळी अतिशय घाबरलो असल्याचं तो म्हणाला. त्याने कारच्या बाहेर येत तिला तु वर का चढली असा सवाल केला. तो पुलावर उतरुन कायदा मोडत होता, तर महिलेने मोठी रिस्क घेतल्याने तो अतिशय घाबरला होता.

महिलेने दोन फोटो विसर्जित केले आणि ती इथे-तिथे पाहू लागली. तिने संजय यादवचा लक्ष विचलित करण्यासाठी फोटोवर शिंपडण्यासाठी थोडं पाणी मागितलं. ड्रायव्हर सतत तिला लवकर विर्सजित करण्याचं सांगत होता, पण ती त्याचं काहीही ऐकत नव्हती.

महिलेची उडी, ड्रायव्हरने तिचे केस पकडले

पाणी आणण्यासाठी जसं ड्रायव्हर कारकडे वळला, त्याने एका ट्रॅफिक पेट्रोल व्हॅनला त्यांच्याजवळ येताना पाहिलं. त्यांचा सायरन वाजत होता. संजयने सांगितलं, की आम्ही दोघांनी सायरन ऐकला आणि दोघंही घाबरलो. त्यानंतर मी महिलेकडे पाहिलं, तोपर्यंत बॅरियरच्या भिंतीवर बसलेल्या महिलेने तिचे पाय बाहेर काढले आणि उडी मारली. तेवढ्यात ड्रायव्हरने त्याचा हात बाहेर काढत तिचे केस पकडले.

तेवढ्यास ट्रॅफिस पोलीस देखील त्याचवेळी तिथे पोहोचले. कॉन्स्टेबल ललित अमरशेत, किरण म्हात्रे आणि यश सोनवणे यांनी लगेच त्यांची गाडी थांबवली आणि पुलाच्या रेलिंगवर चढून आधी महिलेचा हात पकडला. पुलाच्या पूर्णपणे बाहेर गेलेल्या महिलेला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी त्यांना एक मिनिट लागला. त्यानंतर पोलीस तिला नवी मुंबईच्या उल्वे पोलीस स्टेशनला घेऊन गेले आणि तिच्या कुटुंबाला बोलवण्यात आलं.

पोलीस आणि महिलेच्या कुटुंबियांनी तिचा जीव वाचवल्याबद्दल संजय यादवचे आभार मानले. तसंच पोलिसांनी त्याला यापुढे कधीही पुलावर गाडी न थांबवण्याचंही सांगितलं. महिलेला वाचवण्याच्या प्रयत्नात संजय यादवच्या हाताला जखम झाली. मात्र महिलेला वाचवणं अधिक महत्त्वाचं असल्याचं तो म्हणाला. आता त्याला अनेकांचे फोन येतात आणि त्याचं या कामासाठी कौतुक होत असल्याचंही तो म्हणाला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.