Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Dahi Handi 2024: गो…गो…गो…गोविंदा! ठाण्यात रंगणार दहीहंडीचा थरार; जागतिक विश्वविक्रमास मिळणार २५ लाखांचे बक्षीस!

10

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : थरांची स्पर्धा… बाळ गोपाळांचा जल्लोष…. बक्षिसांची लयलूट असा माहोल दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने वर्तकनगरात पाहायला मिळणार आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या ‘संस्कृती प्रतिष्ठान’ आयोजित दहीहंडी उत्सवात यंदा पहिले नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकाला ११ लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच रोख रक्कम, आकर्षक सन्मान चिन्ह देऊन गोविंदांना गौरवण्यात येणार आहे. यासोबत या दहीहंडी उत्सवाला कलाकार आणि राजकीय नेते देखील भेट देणार असल्याने गोविंदांचा उत्साह द्विगुणित होणार आहे.

महिला गोविंदांना विशेष मान या दहीहंडी उत्सवात दुसऱ्या वेळेपासून नऊ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच लाख व आकर्षक ट्रॉफी, आठ थर लावणाऱ्या गोविंदा पथकास २५ हजार व आकर्षक ट्रॉफी, सात थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १५ हजार व सन्मानचिन्ह, सहा थर लावणाऱ्या गोविंदा पथकास १० हजार व सन्मानचिन्ह, पाच थर लावणाऱ्या गोविंदा पथकास पाच हजार व सन्मानचिन्ह; तसेच मुंबई, ठाणे येथील महिलांच्या गोविंदा पथकाला सुद्धा विशेष मान देण्यात येणार असून, त्यांच्यासाठीही विशेष पारितोषिक ठेवले. आहे. उत्सवात युवा पिढीस प्रोत्साहन देण्यासाठी फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले.

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर कायदा करावा

देशासह महाराष्ट्रात महिला अत्याचारांच्या घटना वाढत आहे. या घटनांना पायबंद घालण्यासाठी २०१९मध्ये नागपूर हिवाळी अधिवेशनात भारतीय दंड संहिता, १८६० आणि फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ मध्ये सुधारणा करण्याचे विधानसभेत विधेयक क्र. ५० आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडले होते. आंध्र प्रदेशने भारतीय दंड सहितेच्या कलम ३७६ व ३७६ अ मध्ये दुरुस्ती केली आहे. त्यानुसार महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्यावर तत्काळ शिक्षा देण्याची तरतूद केली आहे. महिलेची तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी प्रकरणाचा ७ दिवसांत तपासात पूर्ण करणे. न्यायालयाने १४ दिवसांत सुनावणी पूर्ण करायची आहे आणि न्यायालयात गुन्हा सिद्ध झाल्यास २१ दिवसांच्या आत आरोपीस शिक्षा देऊन ते प्रकरण निकाली काढायचे आहे, अशी तरतूद या सुधारित कायद्यात अंतर्भूत आहे.
महिलांवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस विहीत मुदतीत म्हणजे २१ दिवसांच्या आत शिक्षेची कायदेशीर तरतूद करणारे आंध्र प्रदेश हे देशातील पहिले राज्य आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही असा कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत केली. या विधेयकाची प्रत दहीहंडीच्या दिवशी मोठ्या स्क्रीनवर लावण्यात येणार आहे. याबाबत दहीहंडी महोत्सवाच्या माध्यमातून जनजागृती केली जाईल, असे सरनाईक यांनी सांगितले.

जागतिक विश्वविक्रमास २५ लाखांचे बक्षीस

नऊ थरांचा विक्रम मोडून दहा थर रचत जागतिक विक्रम करणाऱ्या गोविंदा पथकाला २५ लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यंदा ‘प्रो गोविंदा सीझन २’देखील मोठ्या उत्साहात आणि दिमाखात पार पडला. गोविंदा हा खेळ मातीपासून ते मॅटपर्यंत पोहचला आणि अपघाताचे सत्र थांबले जावे, हा प्रो. गोविंदामागील उद्देश आहे, असे आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारने गोविंदा -खेळाचा क्रीडा प्रकारात समावेश केला आहे. गोपाळकाल्याला – सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ७५ हजार गोविंदांचा मोफत विमा काढण्यात येत आहे. यंदाचा गोविंदा अपघातमुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करू या, असे आवाहनही सरनाईक यांनी केले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.