Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

How to find god in kaliyuga: कलियुगातही सापडेल देव ! करा हे सोपे उपाय, मिळेल आशिर्वाद, सुख-समाधान !!

8

Which God is present in Kali Yuga : ‘कलियुग आहे आता काही सोपे नाही’ असे बोलणे आपण नेहमी ऐकत असतो. शास्त्रानुसार, कलियुगात अधर्म सर्वोच्च पातळीवर असून फक्त भगवंताचे नामस्मरण आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकते. पण सध्याच्या काळात भगवंताचे नाव घेणे किंवा नामस्मरण, जप यासाठी आपल्याकडे वेळ कुठे आहे. आपल्या सगळ्यांना इनस्टंट म्हणजे त्वरित सगळे काही हवे असते. संयम हा जणू आपल्यात राहीलेला नाही. लक्षात ठेवा जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तेव्हा आपलं मन सांगतं एक मार्ग आहे तो म्हणजे नामस्मरणाचा, त्या परमेश्वराच्या चरणात लीन होण्याचा. कलियुगाचा परमेश्वराचा आशिर्वाद तुम्हाला मिळू शकतो त्यासाठी काय करावे जाणून घेऊया.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
How to find god in kaliyuga: कलियुगातही सापडेल देव ! करा हे सोपे उपाय, मिळेल आशिर्वाद, सुख-समाधान !!
Which God is still alive in Kaliyug :
कठोर तपस्या, यज्ञ, ध्यान, जप या गोष्टी आता फक्त पुस्तकात वाचायला किंवा चित्रपटात, वेबसिरीजमध्ये पहायला चांगल्या वाटतात. कलियुगात हे सापडणं थोडं कठिण आहे. तपस्या, यज्ञ, ध्यान, जप यामुळे आपण ईश्वर आणि धर्माच्या जवळ जातो असे शास्त्रात सांगितले आहे. पण सध्या सगळीकडे पाहिले तर अधर्म आणि नकारात्मकतेकडे आपण अधिक झुकतो आहोत असे वाटते आहे. कलियुगाच्या प्रभावाला कमी करण्यासाठी आपली ऊर्जा सकारात्मक ठेवावी, आणि स्वतःला अधर्म आणि पापाच्या प्रभावापासून वाचवायला हवे त्यासाठी काय करावे असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल, चला तर त्याबद्दल अधिक जाणून घेऊया.

सध्या आपण आपल्या कामात इतके व्यस्त असतो की भगवंताचे काय कुटुंबाकडे देखील आपला दुर्लक्ष होतो. मला हे हवंय…मला ते हवंय..या हव्यासापायी आपण धावपळ करतो आणि आपला ताणतणाव वाढवून घेतो. हा त्रास कमी करण्यासाठी ईश्वराचे नामस्मरण करणे अधिक गरजेचे आहे. शास्त्रात याबद्दल अनेक सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत, जे तुम्हाला ईश्वराचे स्मरण ठेवण्यात आणि त्यांच्याजवळ राहण्यास मदत करतात.

देव आहे आणि त्यावर विश्वास ठेवा

या जगात देव आहे आणि तो वेळोवेळी तुम्हाला मदत करतो यावर आधी तुम्ही विश्वास ठेवा. तुम्हाला ईश्वराचे प्रेम, आपुलकी आणि आशिर्वाद मिळावेत असे वाटत असेल तर देवावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. देव या जगात आहे यावर तुमचा विश्वास बसला तर तुम्ही त्याला जाणून घेण्याचा अधिक प्रयत्न कराल तसेच त्याचा आशिर्वाद प्राप्त करण्याचाही प्रयत्न कराल.

नामस्मरण किंवा जप

भगवंताच्या नावाचा जप करणे किंवा नामस्मरण हा कलियुगातील आत्मा शुद्ध ठेवण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे. नामस्मरण तुम्ही कधी ही करु शकता त्याला विशेष असे नियम किंवा बंधन नाही. ईश्वराच्या जवळ जाण्याचा किंवा त्यांचा आशिर्वाद प्राप्त करण्याचा हा सोपा मार्ग आहे.

सत्संग, प्रार्थना आणि ध्यानधरणा

सत्संग आणि भजन ऐकायला कोण जाणार असे आपण अनेकदा ऐकतो पण सत्संग आणि भजन मनाला शांतता आणि समाधान देतात. यामुळे मनात सात्विक विचार येत असून मन विचलीत होत नाही. तुम्ही नियमीतपणे प्रार्थना आणि ध्यानधारणा केली तर मनाची एकाग्रता वाढते आणि भगवंताबद्दलची भक्तीभावना दृढ होते.

भगवद् गीता आणि इतर धार्मिक ग्रंथांचे अध्ययन

भगवद् गीता आणि इतर धार्मिक ग्रंथांचे अध्ययन करा. अनदिकाळापासून हे ग्रंथ मानवाला चांगेल काय आणि वाईट काय याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. यातील उपदेश तुम्हाला जीवनातील योग्य मार्ग नक्की दाखवतील. यामुळे तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल.

व्रत आणि उपवास

आपल्या शास्त्रात व्रत आणि उपवास सांगितलेले आहेत. उपवास केल्यामुळे मनासोबत शरीरदेखील शुद्ध होते. व्रत केल्यामुळे आत्मसंयम वाढतो. तुम्हाला मनाची आणि तनाची शुद्धी करायची असेल तर हे दोन उपाय आहेत. यामुळे मन आणि आत्मा शुद्ध तर होतोच शिवाय आपल्याला शीस्त लागते.

तीर्थयात्रा

पवित्र स्थळांना भेट दिल्याने मनःशांती मिळेत तसेच भगवंताबदद्लची भक्ती वाढते. तीर्थक्षेत्र किंवा जागृत देवस्थान यामध्ये असणारी आध्यात्मीक शक्ती तुमच्या मनाला समाधान देते तसेच तुम्हाला ईश्वराच्या अधिक समीप घेऊन जाते. तिर्थयात्रा केल्यामुळे तुमचे आध्यात्मिक विचार दृढ होतात.

सकारात्मक विचार आणि आचरण

नेहमी सकारात्मक विचार ठेवणे आणि चांगल्या आचरणाचे पालन केले तर जीवनात सुख-शांती आणि समाधान टिकून राहते. मनात वाईट विचार निर्माण होण्याची शक्यता कमी होते आणि शारीरिक ऊर्जा वाढते

सेवा आणि दान

गरजूंची सेवा करणे आणि दान देणे यामुळे फक्त तुम्ही इतरांना मदत करत नाही, तर तुमचे कर्मही शुद्ध करता. तसेच तुम्ही आज मदत केलीत तर तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला नक्की मदत मिळते.

अनिता किंदळेकर

लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.