Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
POCSO Registered Against School Badlapur Girl Assault Case : बदलापूर चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी उच्च न्यायालयाने आदेश देत शाळेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. शाळा प्रशासनाने इतक्या गंभीर गुन्ह्याची माहिती लपवल्याप्रकरणी विशेष तपास पथक अर्थात एसआयटीकडून शाळेवर लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळेवर अशाप्रकारे पोक्सो गुन्हा दाखल झाल्याची ही पहिली वेळ असावी.
Badlapur Case Update: पोलीस-शाळा प्रशासनाची बंद दाराआड चर्चा; चिमुकलीच्या पालकांचा गंभीर आरोप; या एका व्यक्तीमुळे दाखल झाली तक्रार
शाळेवर पोक्सो अंतर्गत गुन्हा
लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पालकांनी शाळेतील अधिकाऱ्यांना दिल्यानंतर शाळेकडून याबाबतची तक्रार पोलिसांत करणं अनिवार्य होतं. मात्र शाळेने तसं केलं नाही. हे प्रकरण लपवण्याचा प्रयत्न शाळेकडून करण्यात आला. शाळेने ही तक्रार पोलिसांत न दिल्याने त्यांच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१२ आणि १३ ऑगस्ट रोजी शाळेत सफाई कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या आरोपी अक्षय शिंदेने दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पालकांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठलं, मात्र पोलिसांनी FIR दाखल करुन घेण्यास विलंब केला. तब्बल १२ तासांनंतर पोलिसांनी FIR दाखल करुन घेतल्यानंतर २१ ऑगस्ट रोजी न्यायालयात या प्रकरणाची दखल घेण्यात आली. त्यानंतर २६ ऑगस्टपर्यंत आरोपीला पोलीस कोठडी असून २७ ऑगस्टला पुढील सुनावणी होणार आहे.
Who is Akshay Shinde : कोण आहे अक्षय शिंदे, ज्या नराधमाने बदलापुरात चिमुकल्यांसोबत केलं दृष्कृत्य
शाळा प्रशासनावर गुन्हा का दाखल झाला नाही? कोर्टाने पोलिसांना फटकारलं
कोर्टाने केलेल्या सुनावणीमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले. मुलींवर झालेल्या अत्याचाराची तक्रार शाळेत, शाळा प्रशासनाकडे केली होती का असा सवाल सरकारकडून केस लढणाऱ्या वकिलांना विचारण्यात आला. त्यावर वकिलांनी हो असं उत्तर दिलं. त्यानंतर शाळेने दखल न घेता प्रकरण लपवलं, त्याप्रकरणी शाळेवर गुन्हा दाखल झाला का असा सवाल कोर्टाकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता शाळेवर गुन्हा दाखल झाला असून न्यायालयाने पोलिसांना सवाल करत, पालकांनी एफआयआर दाखल केल्यानंतर शाळा प्रशासनावर गुन्हा दाखल का केला नाही, याबाबत फटकारलं आहे.
Badlapur Case Update : हायकोर्टाने दखल घेतल्यानंतर खडबडून जाग, आता बदलापूरच्या शाळेवरही पोक्सोचा गुन्हा
त्याशिवाय दुसऱ्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराचा जबाब कुटुंबियांकडून नोंदवून घेण्यात आला नव्हता. कोर्टाने दखल घेतल्यानंतर दुसऱ्या मुलीच्या कुटुंबियांनी जबाब दिला. दुसऱ्या कुटुंबाच्या जबाबासाठी इतका उशीर का असा सवालही हाय कोर्टाने पोलिसांना केला. हे प्रकरण कोणत्याही प्रकारे दाबण्याचा प्रयत्न झाल्यास कोर्ट कारवाई करेल, असं म्हणत कोर्टाने पोलिसांना फटकारलं आहे.