Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
विधानसभेला फटका बसू नये म्हणून अजितदादा पाहा काय म्हणाले; तुम्ही फक्त माझ्या पाठीशी उभे रहा, नाही तर…
NCP Jan Sanman Yatra: लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फटाक बसला होता. आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा फटका बसू नये म्हणून अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आपल्या पाठीशी उभे रहा असे सांगत आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान यात्रा आज इंदापुरात दाखल झाली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर हे उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र सरकार मार्फत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. लाडक्या बहिणीसारखी योजना यापुढेही चालू ठेवायची असेल तर महायुतीच्या सरकारला पाठबळ द्या, असं आवाहनही यावेळी अजित पवारांनी केले.
Ajit Pawar: महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांचे xxx…; दादांनी हातवारे करून सांगितलं, अत्याचार करणाऱ्यांच परत धाडस झालं नाही पाहिजे!
सेल्फी काढा…आणि नंतर नवऱ्याला दाखवा
चालू भाषणात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या डोक्यावरील फेटा निसटला.. डोक्यावरील फेटा बाजूला सारत पवार म्हणाले की, पुढे बसलेल्या माझ्या माता,भगिनींच्या डोक्यावर असलेला फेटा त्यांना खूप शोभून दिसत आहे. मला माझा फेटा शोभून दिसत नाही म्हणून मी काढला, तुमच्या डोक्यावर फेटा शोभून दिसत आहे.. असे म्हणत तुम्ही घरी जाताना एक सेल्फी काढा.. आणि नंतर नवऱ्याला दाखवा. आणि त्याला म्हणावं बघ..बघ..कसा दिसतोय फोटो.. दादांनी सुद्धा कौतुक केलं.. शहाण्या तू तर कधीच कौतुक करत नाही.. बघ माझं दादांनी कौतुक केलं.. असं त्याला म्हणा, असे गमतीशीर वाक्य बोलताच सभागृहात हास्या बरोबरच टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला.
Chandrapur Crime News: महाराष्ट्र हादरला! गतिमंद महिलेवर सामुहिक बलात्कार, बसस्थानकातील प्रसाधनगृहात अत्याचार; व्हिडिओ केला व्हायरल
हेल्पलाइन सुरू
महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजनांची माहिती कार्यकर्त्यांनाच नाही. त्यामुळे या शासकीय योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइन मध्ये आपणाला विविध योजनांची माहिती देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे पवारांनी यावेळी सांगितले.