Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

परभणीचे खासदार संजय जाधवांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल

9

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Aug 2024, 11:07 pm

sanjay jadhav : परभणी शहरासाठी भव्य असे क्रीडा संकुल व्हावे म्हणून येथील कृषी विद्यापीठातील 25 एकर जमीन मंजूर करण्यात आली होती. पण ते कामही थांबवण्यात आले आहे. शहरातील रस्त्यासाठी काँग्रेसने शंभर कोटी रुपये महाविकास आघाडीच्या काळात मंजूर करून घेतले होते तो निधी देखील थांबविण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे आज परभणी शहराची जी बघायला अवस्था झाली आहे. त्याला एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जबाबदार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
धनाजी चव्हाण, परभणी : परभणी शहराची बकाल अवस्था आज जी झाली आहे त्याला केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेव जबाबदार आहेत. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना परभणी शहराची अंडरग्राउंड ड्रेनेज योजना ही मंजूर झाली होती पण त्यानंतर सरकार बदलले आणि मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे यांनी ती योजना गुंडाळली. तसेच परभणी शहरासाठी भव्य असे क्रीडा संकुल व्हावे म्हणून येथील कृषी विद्यापीठातील 25 एकर जमीन मंजूर करण्यात आली होती. पण ते कामही थांबवण्यात आले आहे. शहरातील रस्त्यासाठी काँग्रेसने शंभर कोटी रुपये महाविकास आघाडीच्या काळात मंजूर करून घेतले होते तो निधी देखील थांबविण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे आज परभणी शहराची जी बघायला अवस्था झाली आहे. त्याला एकमेव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जबाबदार असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांनी म्हटले आहे.

उद्या 24 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील, आमदार सुरेश वरपुडकर, डॉक्टर विवेक नावंदर, शिवसेना जिल्हाप्रमुख विशाल कदम, भगवान वाघमारे,जाकीर लाला यांच्यासह महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना खासदार संजय जाधव म्हणाले की, ”परभणी शहरात नवीन नाट्यगृह होत आहे. पण त्याचा देखील निधी या सरकारने अडवलेला आहे. जुन्या नाट्यगृहाला निधीची तरतूद केली जात नाही. ठीक ठिकाणी विकास कामे रोखण्याचे काम हे सरकार करत आहे. याची एकमेव कारण आहे की परभणी जिल्ह्यातील कोणताही शिवसेनेचा आमदार किंवा खासदार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला नाही. तुम्ही आमच्याकडे या तुम्हाला निधी देऊ असे आम्हाला वेळोवेळी सांगण्यात आले पण आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली नाही. आणि त्यामुळेच परभणी शहरा ची बघाल अवस्था झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही जी वृत्ती आहे ती भस्मासुरा सारखी आहे. तुम्हाला काय लुटायचे ते लुटा पण परभणी शहराच्या विकास थांबू देऊ नका”. असेही संजय जाधव म्हणाले.

बदलापूर येथे झालेली घटना ही मानवतेला कालीमा हसणारी घटना आहे. पण या सरकारला त्याचे काही घेणे देणे नाही. या घटनेचा निषेध करणाऱ्या सामान्य नागरिकांना जेलमध्ये टाकण्याचे काम या सरकारने केले. हे सरकार असमेंदनशील आहे आता या सरकारच्या पापाचा घडा भरला आहे. चोर खाकीच्या आणि कायद्याच्या जोरावर हे सरकार चालवण्याचे काम सुरू आहे. या सरकारने काही जरी केले तरी आता हे सरकार पुन्हा सत्तेवर येणार नसल्याचेही खासदार संजय जाधव म्हणाले.

भाजपने कधीच आंदोलन केले नाही आमच्या बळावर सत्ता बळकावली राज्यामध्ये जी महायुतीचे सरकार आलं ते सरकार आणण्यासाठी शिवसेनेच्या शिवसैनिकांनी लठ्या काठ्या खाल्ल्या. आंदोलने केली महाविकास आघाडीचे सरकार असताना त्या सरकारच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरून सरकारला विरोध केला. आणि त्यानंतर जेव्हा 2014 ला महायुतीचे सरकार आले तेव्हा भाजप अलगद सत्तेमध्ये बसली. माहितीची सत्ता आणण्यासाठी भाजपने कधीच प्रयत्न केले नाहीत किंवा रोष ओढून घेतला नाही. आम्ही शिवसैनिकांनी आंदोलने केली त्याचबरोबर आम्ही आमच्या अंगावर गुन्हे देखील नोंदवून घेतले. त्यामुळेच आता या भाजप सरकारने राज्यात कोणी आंदोलने करू नये म्हणून कायद्यामध्ये बदल देखील केला आहे.

सगळे सर्वे करूनही भाजप 70 जागाच्या पुढे जात नाही भाजपने मागील काही दिवसात वेगवेगळे सर्वे करून पाहिले पण भाजपला 70 ते 80 जागांच्या वर जागाच मिळत नाहीत त्यामुळे आता हे सरकार राज्यातील विधानसभेच्या निवडणुका लांबीचा प्रयत्न करत आहे. लाडक्या बहिणीसारख्या योजना त्यांनी आणल्या आणि जनतेला फूस लावण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही. निवडणुका जरी लांबीचा प्रयत्न केला तरी येणाऱ्या काही दिवसात सोयाबीन या सरकारला रडविल्याशिवाय राहणार नाही असेही जाधव म्हणाले. या सरकारने कितीही निवडणुका लांबवल्या आणि काही जरी केले तरी आता महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचा या सरकारवर रोष आहे आणि या सरकारला ते घरी बसविल्याशिवाय राहणार नसल्याचेही जाधव म्हणाले.

अजित भाबड

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.