Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nagpur Bribe Case: भू करमापक अडकला एसीबीच्या ‘मोजणीत’; ६० हजारांची लाच घेताना पकडलं रंगेहाथ, काय प्रकरण?
Nagpur Bribe Case: तक्रारदार युवकाची पत्नी व तिच्या बहिणींच्या नावे कामठीतील मौजा पावनगाव येथे सव्वातीन हेक्टर शेती आहे. याची पोट वाटणी करून त्याची ‘क’ प्रत तक्रारदाराला हवी होती.
काय आहे प्रकरण?
वैभव अशोकराव पळसापुरे (वय ५१) असे अटकेतील मापकाचे नाव आहे. ३०वर्षीय युवकाच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार युवकाची पत्नी व तिच्या बहिणींच्या नावे कामठीतील मौजा पावनगाव येथे सव्वातीन हेक्टर शेती आहे. याची पोट वाटणी करून त्याची ‘क’ प्रत तक्रारदाराला हवी होती. यासाठी त्याने अर्ज केला. पळसापुरे यांनी मोजणी करून पडताळणी केली. प्रत देण्यासाठी त्यांनी तक्रारदाराला ६० हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अर्ज केला. अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक संजय पुरंदरे, निरीक्षक शिवशंकर खेडेकर, उज्ज्वला मडावी, महेश सेलोकर, पंकज अवचट, प्रफुल्ल बांगडे, सचिन किन्हेकर, प्रिया नेवरे यांनी बुधवारी सायंकाळी वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचला. लाच घेताच एसीबीने पळसापुरे यांना अटक केली. त्यांच्याविरुद्ध वाठोडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
Waman Mhatre: महिला पत्रकारासाठीचे आक्षेपार्ह विधान भोवले, वामन म्हात्रेंवर विनयभंगाचा गुन्हा दाखल
दुसरं प्रकरण: लाच घेताना लिपिकास पकडले
जळगाव : बदली झाल्याने त्या ठिकाणी जायला कार्यमुक्त करण्यासाठी एक लाख ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेतील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपिकास लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि. २१) रात्री हॉटेलमध्ये पकडले. नरेंद्र किशोर खाचणे (वय ५२) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर लिपिकाचे नाव आहे. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Nagpur Bribe Case: भू करमापक अडकला एसीबीच्या ‘मोजणीत’; ६० हजारांची लाच घेताना पकडलं रंगेहाथ, काय प्रकरण?
यावल तालुक्यातील सावखेडासीम प्राथमिक आरोग्य केंद्रात २६ वर्षीय तक्रारदार शिपाईपदावर कार्यरत होते. मात्र, नुकतीच त्यांची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर रावेर पंचायत समितीत बदली करण्यात आली. बदलीच्या ठिकाणी कार्यमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदमधील सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ लिपीक नरेंद्र किशोर खाचणे यांनी बुधवारी शिपायाकडे दोन लाखांची लाच मागितली. त्यात तडजोडीनंतर एक लाख ८० हजार रुपये देण्याचे निश्चित झाले. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.