Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nepal Bus Accident Jalgaon Sarode Family People Death: या अपघातात वरणगाव येथील सरोदे कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबासह नातेवाइकांना मोठा धक्का बसला. संदीप राजाराम सरोदे, पल्लवी संदीप सरोदे, गोकर्ण संदीप सरोदे, अनुप हेमराज सरोदे या चौघांचा मृत्यू झाला.
हायलाइट्स:
- नेपाळ बस भाविकांचा बस अपघात
- जळगावातील १० जणांचा मृत्यू
- सरोदे कुटुंबार दु:खाचा डोंगर
Nepal Bus Accident Jalgaon: दर्शनाला येतो का? वडिलांची लेकाला विचारणा, मुलाचा नकार; नेपाळ दुर्घटनेत शुभम बचावला
वारकरी कुटुंबातील चौघांचा मृत्यू
या अपघातात वरणगाव येथील सरोदे कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबासह नातेवाइकांना मोठा धक्का बसला. संदीप राजाराम सरोदे, पल्लवी संदीप सरोदे, गोकर्ण संदीप सरोदे, अनुप हेमराज सरोदे या चौघांचा मृत्यू झाला. तर, कुटुंबातील दोन जण जखमी झाले आहेत. सरोदे कुटुंबाचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. संदीप सरोदे हे पत्नीसह पंढरीची वारी करतात, तसेच गावात भागवत सप्ताहही भरवतात. अशा धार्मिक वृत्तीच्या कुटुंबातील चौघांचा देवदर्शनादरम्यान मृत्यू झाल्याने सर्व सुन्न झाले. महत्त्वाची बाब म्हणजे, संदीप सरोदे यांनी आपला मुलगा शिवमला देखील तीर्थक्षेत्राला येण्यासाठी विचारणा केली होती.
Nepal Bus Accident Jalgaon : पशुपतिनाथहून निघाले, धबधबा अवघ्या एक किमीवर, इतक्यात… जळगावच्या २७ भाविकांना गिळणाऱ्या अपघाताचा थरार
या अपघातात संदीप सरोदे यांचा भाऊ हेमराज सरोदे आणि त्यांची पत्नी रूपाली सरोदे हे गंभीर जखमी झाले आहेत. संदीप सरोदे यांच्या आई मंदा सरोदे आणि मुलगा शुभम सरोदे हे तीर्थ यात्रेला गेले नव्हते. मयत गोकर्ण सरोदे ही जळगाव शहरातील आयमार महाविद्यालयात MBBSचे शिक्षण घेत होती. तर पुतण्या अनुप सरोदे हा काही महिन्यापूर्वीच पुण्याला खासगी कंपनीत नोकरीला लागला होता. आता या सरोदे कुटुंबामध्ये फक्त आजी आणि नातू असल्याने या परिवारावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे.
सरोदे दाम्पत्याची पंढरीवारी नुकतीच झालेली
संदीप सरोदे आणि त्यांच्या पत्नी पल्लवी सरोदे या अत्यंत धार्मिक स्वभावाच्या होत्या, अशी माहिती त्यांच्या शेजारच्यांनी दिली. गेल्याच महिन्यात या दाम्पत्याने आळंदी ते पंढरपूरपर्यंत पयी वारी केली. तसेच गणेश नगरातील धार्मिक कार्यक्रमांमध्ये हे कुटुंब नेहमीच अग्रेसर राहायचं. सरोदे कुटुंबाचा वीट भट्टीचा व्यवसाय होता. सर्वकाही आनंदात सुरू असताना अचानक त्यांच्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने होत्याचे नव्हते झाले.
शुभमही जाणार होता अयोध्येला पण…
संदीप सरोदे यांचा मुलगा शुभम हा पुण्याला नोकरीला आहे. त्यालाही वडिलांनी या यात्रेला येण्याबाबतची विचारणा केली होती. मात्र सुट्टी न मिळाल्याने तो जाऊ शकला नाही. त्यामुळे सुदैवाने शुभम देखील या अपघातातून बचावला. शुभमला शुक्रवारी सकाळी टीव्हीवर अपघाताची माहिती मिळाली होती. त्यानंतर आई वडील असलेल्या बसचाच अपघात झाल्याचे कळताच शुभम पुण्याहून वरणगावकडे निघाला.