Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Stree 2 Box Office Collection: राजकुमार राव आणि श्रद्धा कपूरचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘स्त्री २’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात अनेक मोठ्या चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहेत. जाणून घेऊ दुसऱ्या शुक्रवारी सिनेमाने किती कमाई केली.
हायलाइट्स:
- श्रद्धा कपूरच्या चित्रपटाने ‘पठाण’सह ५ चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले
- ९व्या दिवशीही चांगली कमाई
- ‘स्त्री २’ श्रद्धा कपूरचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.
Anjali Devi: बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात, दुसऱ्या महायुद्धादरम्यान केलेली मोठी मदत
‘स्त्री २’ ने या सिनेमांना टाकलं मागे
२०१८ मध्ये आलेल्या ‘स्त्री’ चित्रपटाचा सिक्वेल असलेला ‘स्त्री २’ हा ४०० कोटींचा टप्पा गाठणारा बॉलिवूडचा सर्वात वेगवान सिनेमा बनला आहे. स्त्री २ ने शाहरुख खानचा ‘जवान’ (११ दिवस), रणबीर कपूरचा ‘अनिमल’ (११ दिवस), किंग खानचा ‘पठाण’ (१२ दिवस), सनी देओलचा ‘गदर २’ (१२ दिवस), प्रभासचा ‘बाहुबली २’ यांना मागे टाकले आहे.
Ankita Walawalkar: माहेरच्या गणपतीची खास अट घालून अंकिताचा बॉयफ्रेंडला लग्नासाठी होकार, काय घडलेलं नेमकं?
श्रद्धा कपूरचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट
श्रद्धा कपूरची मुख्य भूमिका असलेला ‘स्त्री २’ हा तिच्या कारकिर्दीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. सर्वात शेवटी २०१९ मध्ये रिलीज झालेल्या साहोने सर्वाधिक कमाई केलेली. ज्यामध्ये प्रभास तिच्यासोबत प्रमुख भूमिकेत होता. साहोने सर्व भाषांमध्ये ३१०.६० कोटी रुपये कमावले होते, तर हिंदी डब केलेल्या आवृत्तीने १४५.६७ कोटी रुपयांची कमाई केली होती. बॉक्स ऑफिसच्या रेकॉर्डमध्ये, ‘स्त्री २’ हा २०२४ चा दुसरा सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट बनला आहे. मात्र अद्याप हा सिनेमा नाग अश्विनच्या कल्की २८९८ एडीच्या मागे आहे, कल्कीने १,१०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.
Stree 2: बॉक्स ऑफिसवर नवव्या दिवशीही स्त्री २चा धुमाकूळ, श्रद्धा कपूरच्या सिनेमाने मोडले हे रेकॉर्ड्स
इतर कोणताही चित्रपट स्पर्धेत नाही
या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, पंकज त्रिपाठी आणि अपारशक्ती खुराना यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. येत्या आठवडाभरात ‘स्त्री २’ सोबत दुसरा कोणताही चित्रपट स्पर्धा करताना दिसत नाही. या हॉरर-कॉमेडीसह प्रदर्शित झालेले ‘खेल खेल में’ आणि ‘वेदा’ चित्रपटगृहांमध्ये यापूर्वीच अपयशी ठरले असून आता येत्या आठवड्यात इतर कोणतेच चित्रपट स्त्री २ शी स्पर्ध करायला नाही. त्यामुळे येत्या काळात हा सिनेमा आणखी किती कमाई करेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.