Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Dhule two school children drown: धुळे जिल्ह्यातील निमडाळे गावात दुर्दैवी घटना घडली आहे. येथील शेतशिवारातील अवैध खदानीमध्ये बुडून दोन शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हितेश सूर्यवंशी पाटील आणि मयूर वसंत खोंडे हे दोन्ही विद्यार्थी निमडाळे येथील शाळेत इयत्ता आठवीत शिकत होते. शाळकरी विद्यार्थ्यांची वनभोजनासाठी शिफाई धरण परिससरात सहल गेली होती. यावेळी परिसरात असलेल्या शिफाई धरणाजवळ मोठी खदान आहे. काही विद्यार्थी शिक्षकांची नजर चुकवून तेथे फिरण्यासाठी गेले होते. दोन शाळकरी विद्यार्थी हे शिफाई धरणात पोहण्यासाठी उतरले असताना विद्यार्था दगडाच्या खदानीत अडकले. धरण पात्रात बुडत असताना शिक्षकांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे सारे प्रयत्न फोल ठरले. तेथील काही पट्टीच्या पोहणाऱ्यांनी दोघांना बाहेर काढून त्यांची उत्तरीय तपासणीसाठी येथील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. परंतु डॉक्टरांनी तपासणीअंती त्या विद्यार्थ्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी देवपूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Nepal Bus Accident : महाराष्ट्रावर शोककळा! ४० पर्यटकांची बस नेपाळमध्ये नदीत कोसळली, १४ जणांना जलसमाधी
कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांची परिस्थिती हलाखीची आहे. वसंत खोंडे यांना दोन मुले होती. यापैकी मयूर हा सर्वात लहान असून मयूरला एक मोठा भाऊदेखील आहे. मयूर याला वडिलांच्या परिस्थितीची जाणीव होती. वडिलांचे गावात सलून असून शाळा शिकून सुट्टीच्या दिवशी आपल्या वडिलांच्या दुकानात त्यांना मदत करून हातभार लावयाचा.
तर हितेश सूर्यवंशी पाटील या विद्यार्थ्यांचे वडील शेतकरी आहेत. हितेश त्यांचा एकुलता एक मुलगा होता, त्याच्या पश्चांत लहान बहीण आहे. मयूर व हितेश दोघेही हुशार विद्यार्थी होते. दोघांच्या अशा प्रकारे मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. दोघे शाळकरी विद्यार्थ्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे, गावकरी सुन्न झाले आहेत. तर अवैध खदानींनी दोन विद्यार्थ्यांचा बळी घेतल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
Badlapur Case: गुन्हे दोन, FIR एक, स्वतःच्या सोयीनुसार शब्दरचना, बदलापूर प्रकरणात पोलिसांची हलगर्जी समोर
पोलिसांचे आवाहन
सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस हा जोरदार सुरू आहे. त्यामुळे नदी नाले हे दुथडी भरुन वाहू लागले आहेत. तरी शाळकरी विद्यार्थी किंवा परिवाराने पावसाळ्यात कुठेही फिरण्यासाठी जाऊ नये व पालकांनी आपापल्या मुलांची जबाबदारी घेत त्यांना बाहेर जाऊ देऊ नये, असे आवाहन केले आहे.