Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बदलापूर घटनेवरून अजित पवारांना संताप अनावर, वाचा काय म्हणाले?

9

Authored byअजित भाबड | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 Aug 2024, 7:43 pm

badlapur school case : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बदलापूर घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर विरोधकांना देखील टोला लगावला आहे. अजित पवार आज यवतमाळ येथील आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
यवतमाळ : बदलापूर अत्याचार प्रकरणावरून राज्यभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील बदलापूर घटनेवरून संताप व्यक्त केला आहे. त्याचबरोबर विरोधकांना देखील टोला लगावला आहे. अजित पवार आज यवतमाळ येथील आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

मी कोणत्याही घटनेचा समर्थन करणारा नाही

अजित पवार म्हणाले की, ” माझी विरोधकांना विनंती आहे. वेगवेगळ्या घटना अनेकांच्या काळात घडल्या.मी कोणत्याही घटनेचा समर्थन करणारा माणूस नाही. जो व्यक्ती चुकीचे वागेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मग तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या. आम्ही त्या व्यक्तीला कडक शासन करणार आहोत. अशा प्रकारची विकृत माणसं आमच्या आया बहिणींवर हात टाकतात तेव्हा त्यांना बडगा दाखवणं गरजेचा असतो. माझ्या भाषेत सांगायचे झाले तर अशा विकृत व्यक्तींचे सामानच काढून टाकले पाहिजे”. असं अजित पवार म्हणाले आहेत.
Uddhav Thackeray at MVA Protest : नराधमांना पाठीशी घालणारं सरकार, राज्यकर्त्यांचे ‘सदा’ आवडते लोकही विकृत, उद्धव ठाकरे कडाडले, सेनाभवनाबाहेर काळ्या फितीत आंदोलन

राज ठाकरेंनी गुन्ह्यांची यादी वाचली

राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराबद्दलची आकडेवारी नमूद केली आहे. ते म्हणाले की, “बलात्कार, हुंडाबळी, विनयभंग, लैंगिक शोषण, अनैतिक व्यापार आणि इतर अत्याचार वाढले आहे. पोलीस ठाण्यात 2017 मध्ये 4320, 2018 मध्ये 4974, 2019 मध्ये 5412, 2020 मध्ये 4846, 2021 मध्ये 5954, 2022 मध्ये 7084 आणि 2023 मध्ये 7521 बलात्काराचे गुन्हे दाखल झाले आहे. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दर तासाला एका गंभीर गुन्ह्याची बातमी येते. आणि नोंद न झालेले गुन्हे अधिक असतील. नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार, उत्तर प्रदेश अंतर्गत महाराष्ट्रात महिलांवरील गुन्ह्यांची नोंद झाली आहे.” राज ठाकरे यांनी आज नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत हि माहिती दिली आहे.

दरम्यान, आज महाविकास आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत, शरद पवार यांनी पुण्यात तर बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये आंदोलन करत बदलापूर घटनेचा निषेध केला आहे.

अजित भाबड

लेखकाबद्दलअजित भाबडअजित भाबड, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. अजित यांनी आबासाहेब गरवारे कॉलेजमधून पत्रकारितेची मास्टर्स पदवी मिळवली आहे. त्यांना राजकीय, सामाजिक, अंतरराष्ट्रीय तसेच कृषी क्षेत्रातील विश्लेषणात्मक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.