Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

जळगाव विमानतळावर शोकाकूल वातावरण! २५ भाविकांचे मृतदेह दाखल, नातेवाईकांचा आक्रोश

9

Jalgaon : नेपाळ येथे झालेल्या अपघातातील २५ भाविकांचा मृतदेह घेऊन वायुसेना जळगाव विमानतळावर दाखल

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
भाविकांचे मृतदेह जळगाव विमानतळावर आले
जळगाव, निलेश पाटील : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील तसेच तळवेल येथील आणि अन्य गावातील भाविक अयोध्या तसेच इतर देवस्थानाच्या देवदर्शनासाठी गेले होते. पण नेपाळ येथे देवदर्शनाला जात असताना ४० भाविकांनी भरलेली बस चालकाच्या चुकीमुळे खोल दरीत कोसळली आणि जागीच तब्बल २५ भाविक ठार झाले. जळगाव जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. जळगाव विमानतळावर नेपाळ इथून २५ भाविकांचे मृतदेह दाखल झाले आहेत. याच २५ भाविकांसाठी २६ रुग्णवाहिका याच ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. मयतांच्या नातेवाईकांसह नागरिकांनी मोठे गर्दी जळगाव जिल्ह्यात केली आहे.
Nepal Accident : नेपाळ बस अपघातातील सर्व प्रवासी जळगावचे, पाहा बसमधील प्रवाशांची यादी

सध्या मृतदेह वायुसेनेच्या विमानातून उतरवण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक नातेवाईकाला आत मध्ये बोलवून मृतदेहाची ओळख पटवून रुग्णवाहिका मध्ये ठेवण्यात येत आहे. काही घरातील चार सदस्य तर काही घरातील दोन,तीन, एक असे सदस्य मयत झाले आहेत. मृतदेह वरणगाव दिशेने नेण्यात येणार आहेत. यासोबत केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, पालकमंत्री अनिल पाटील मदत व पुनर्वसन मंत्री गुलाबराव अनिल पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन तसेच स्थानिक आमदार उपस्थित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उद्या जळगाव दौरा असल्याने जिल्ह्यात मोठा पोलीस फौजफाटा लावण्यात आला आहे. तसेच बाहेरी देशातील वायुसेनेचे विमान असल्याने याच ठिकाणी आलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी देखील करण्यात येत आहे.

जळगाव विमानतळावर शोकाकूल वातावरण! २५ भाविकांचे मृतदेह दाखल, नातेवाईकांचा आक्रोश

कायदेशीर बाबांची पूर्तता करून प्रशासनाने नातेवाईकांच्या स्वाधीन मृतदेह दिले आहेत. यामध्ये एक मुलगी बेपत्ता असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी माहिती दिली आहे. सर्व मृतदेहांवर वरणगाव आणि तळवेल येथे अंत्यविधी करण्यात येणार आहे.

प्रतीक्षा बनसोडे

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.