Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मतदार आपला राग मतदानावेळी काढतील
”मविआला झालेलं मतदान नीट समजून घेतलं पाहिजे. शरद पवारांनी फोडाफोडीचे राजकारण केलं. शरद पवारांनी जातीचं राजकारण केलं. त्यांनी जाती-जातींमध्ये विष कालवलं. त्यामुळे एकगठ्ठा मुस्लीम समाजाने मोदी शहांविरोधात मतदान केलं. भाजपच्या काही लोकांनी संविधान बदलणार अशी वक्तव्य केली होती. त्यामुळे दलित समाजानेही मोदी शहांविरोधात मतदान केलं. ठाकरे-पवारांच्या प्रेमाखातर हे मतदान झालेलं नाही. मतदार आपला राग मतदानावेळी काढतील. राजकारणात झालेला चिखल लोक विसरलेले नाहीत. फोडाफोडीच्या राजकारणाची सुरुवात पवारांनी केली. जातीचं विषही पवारांनी कालवलं. संतांची आडनाव राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच बोलली जाऊ लागली. महापुरुषांची विभागणी राष्ट्रवादीच्या जन्मानंतरच झाली, असंही ठाकरे यावेळी म्हणाले.
राज ठाकरेंचा इरादा पक्का
राज ठाकरेंना विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवारसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले की, वरळीत एकदा उमेदवार दिला नाही, तर हे वारंवार होणार नाही. सर्व मतदारसंघात उमेदवार देणार. आदित्य ठाकरेचं काय, शिंदे-फडणवीसांच्या मतदारसंघातही उमेदवार देणार, असं म्हणत राज ठाकरेंनी आपला इरादा पक्का असल्याचं सांगितलं.
आरोपींना ठेचलंच पाहिजे
बदलापूर प्रकरणासंदर्भातही राज ठाकरे यांनी भाष्य केलं. राज्यात पोलीस स्टेशनमध्ये हजारो बलात्काराच्या घटनांची नोंद झालेली आहे. त्यांनी यावेळी नॅशनल क्राईम ब्युरो रेकॉर्डचं वाचन देखील करुन दाखवलं. बदलापूरचं प्रकरण अतिशय दुर्दैवी आहे. अशा आरोपींना, लोकांना ठेचलंच पाहिजे. कठोर शासन होत नाही त्यामुळे हे प्रकार होतायत. निर्भया प्रकरणातील नराधमांना कित्येक वर्षांना फाशी झाली? असा सवाल देखील त्यांनी केला. आज ज्यांनी बंद पुकारला त्यांच्या काळातही असे प्रकार झाले आहेत. लॉकडाऊनच्या काळात उद्धव ठाकरे आतच बंद, त्यामुळे बाहेर बंद केला नाही, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.
सरकारने पोलिसांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. जरांगेंच्या आंदोलनात लाठीचार्ज झाल्यावर उलट पोलिसांवर कारवाई झाली. आजवरच्या गुन्हेगारीबाबत गृहमंत्र्यांना शून्य माहिती असते. पोलिसांकडे खरी माहिती असते. पोलिसांच्या पायात बेड्या घातल्या तर कसे धावतील, असंही ते म्हणाले.