Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सरकारचे शैक्षणिक धोरण फेल; बदलापूर प्रकरण शिक्षकांनी गाभीर्याने पाहावी : सुप्रिया सुळे

11

परभणी, डॉ.धनाजी चव्हाण : काळानुसार शिक्षण प्रणालीमध्ये बदल आवश्यक असतो, याच अनुषंगाने केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी नवीन शैक्षणिक धोरण जाहीर केले आणि त्याची अंमलबजावणी सुरू केली. यासहित स्किल इंडिया संकल्पना देखील राबविण्यास सुरुवात केली, पण आज आपण प्रत्यक्षात पाहत आहोत की नवीन शैक्षणिक धोरण असो की स्किल इंडिया या दोन्ही योजना फेल ठरल्या आहेत. दुर्दैव म्हणजे सध्या केंद्रामध्ये जे सरकार आहे, ते शिक्षण आणि शिक्षकांच्या बाबतीत गंभीर नाही. आम्ही विरोधक असूनही नवीन शैक्षणिक धोरण आणि स्किल इंडिया दोन्ही धोरणासाठी सरकारला पाठिंबा दिला. पण हे सरकार यशस्वीपणे राबवू शकले नाही असे म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या अपयशावर बोट ठेवले आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत परभणी येथे शिक्षक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पण खराब हवामानामुळे सुप्रिया सुळे यांचा परभणी दौरा ऐनवेळी रद्द झाला. त्यामुळे त्यांनी व्हीसीद्वारे मेळाव्याला संबोधन केले. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शिक्षक सेलचे मराठवाडा अध्यक्ष किरण सोनटक्के माजी आमदार विजय भांबळे माजी आमदार जयप्रकाश दांडेगावकर जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजय गव्हाणे, महिला जिल्हाध्यक्षा मनीषा केंद्रे, भीमराव हत्ती आंबिरे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाले की, सध्या राज्यात जे सरकार आहे ते देखील शिक्षकांच्या आणि शिक्षणाच्या प्रश्नाविषयी गंभीर नाही. आजही राज्य राज्यातील मोठ्या प्रमाणावर शिक्षक वेतनापासून वंचित आहेत. काही शिक्षकांना तर २०% ते ४०% प्रमाणे वेतन मिळत आहे. पण शिक्षकांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यायला याच सरकारला वेळ नाही. राज्यात जे सरकार आहे ते काही महिन्यापुरतेच आहे. आपले सरकार आल्यानंतर शिक्षकांचे सर्व प्रश्न सोडवले जातील असेही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. विरोधक म्हणून या सरकारला आम्ही सहकार्य केले पण सरकार अपयशी ठरल्याचे खंत त्यांनी बोलून दाखवली.

राज्यातील राजकारणाविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रातील राजकारण गलिच्छ व वैयक्तिक पातळीवर गेले आहे. त्यामुळे राजकारण राज्यातील राजकारणाची पातळी पार ढासाळली आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा प्रयत्न करावा. चांगले लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर चांगले काम होऊ शकते.
Baramati News : दोनशे कोटींची नुसती जाहिरात करता आणि राज्यात महिला मात्र सुरक्षित नाहीत, सुप्रिया सुळेंची टीका

बदलापूरची घटना गांभीर्याने घ्या

नुकतीच बदलापूर येथे झालेली घटना आणि त्याचबरोबर राज्यात अन्यत्र घडलेल्या अशाच घटनांकडे शिक्षकांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. आपल्या शाळेत अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी देखील शिक्षकांनी प्रयत्न केले पाहिजे. त्याचबरोबर ज्यांच्यावर ही वेळ ओढावली आहे त्यांना देखील धीर दिला पाहिजे. त्यांच्यासोबत हिमतीने उभे राहिले पाहिजे. कारण अशा प्रकारच्या घटना कुठेही होऊ शकतात. बदलापूर घटनेविषयी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाचे मात्र चांगलेच कौतुक केले. मीडियाने या घटनेचे गांभीर्य ओळखून पिढीतेला न्याय मिळवून देण्यासाठी तर प्रयत्न केलेच पण त्यांचे नाव कुठेच उघडे पडू दिले नाही. त्यामुळे मीडियाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे असेही त्या म्हणाल्या.

शिक्षकांच्या रिकाम्या जागा भरा, समाजाला दूध खुळे समजू नका – किरण सोनटक्के

राज्यामध्ये शिक्षकांच्या हजारो जागा रिकामे आहेत. तर दुसरीकडे शासनाकडून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आठ ते दहा हजार रुपये मानधन देऊन शिक्षकांची भरती केली जाते. एकीकडे शिक्षक भरतीसाठी टीईटीची परीक्षा अनिवार्य असताना या योजनेच्या माध्यमातून केवळ डिग्रीधारकांना नोकरी देण्याचा सपाटा या सरकारने लावला आहे. एवढ्या तुटपुंज्य मानधनावर शिक्षकांनी काम तरी कसे करायचे असा सवाल राष्ट्रवादी शिक्षक सेलचे मराठवाडा अध्यक्ष किरण सोनटक्के यांनी उपस्थित केला. राज्य सरकारने तात्काळ शिक्षक भरती करावी आणि शिक्षकांना त्याच्या योग्य मोबदला द्यावा असेही ते म्हणाले. या नव्या योजनेच्या माध्यमातून ज्या शिक्षकांची भरती केली जात आहे त्यामध्ये आरक्षण नाही. आरक्षण नसल्यामुळे समाजातला वंचित घटक वंचितच राहणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने शिक्षकांच्या भावना लक्षात घ्याव्या आणि त्यांच्या न्याय मागण्या पूर्ण कराव्या असेही ते म्हणाले.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.