Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुद्धा केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू केली आहे. सरकारच्या याच मोठ्या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. आज मुंबईत पार पडलेल्या सह्याद्री अतिथीगृहावरील मंत्रिमंडळ बैठकीत राज्य सरकारने निर्णयाची घोषणा केली आहे. सरकारच्या वित्त विभागाच्या अंतर्गत निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कालच केंद्र सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली (एनपीएस) लागू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. राज्य सरकारने सुद्धा लगेच सुधारित निवृत्तीवेतन राज्यात सुद्धा लागू केली आहे.
यासह सरकारने आणखी काही विभागात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत पुढीलप्रमाणे..
ऊर्जा विभाग
राज्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांना दिवसा अखंडित वीज देणार. योजनेची व्याप्ती वाढवली
सार्वजनिक आरोग्य
गटप्रवर्तकांच्या मानधनात ४ हजारांची भरीव वाढ
क्रीडा विभाग
ऑलिंपिकवीर स्व. पै.खाशाबा जाधव कुस्ती संकुलाच्या कामास वेग देणार
ऊर्जा विभाग
थकीत देण्यांसाठी महावितरण कंपनीस कर्जाकरिता शासन हमी
जलसंपदा विभाग
– पर्यायी खडकवासला फुरसुंगी बोगदा काढणार परिणामी पुणे परिसरात सिंचन, पिण्यासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार
– नार – पार – गिरणा नदी जोड प्रकल्पाला७ हजार १५ कोटीस मान्यता नाशिक, जळगाव जिल्ह्याला सिंचनाचा मोठा फायदा
सहकार विभाग
सहकारी साखर कारखान्यांना शासन हमीवरील कर्ज परतफेडीसाठी संपूर्ण संचालक मंडळावर जबाबदारी
सामान्य प्रशासन
शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या ३० ऑगस्टपर्यंत
सामाजिक न्याय
– ज्येष्ठ नागरिकांसाठी महामंडळ सव्वा कोटी ज्येष्ठांना लाभ
– ठाणे येथील महत्वाकांक्षी क्लस्टर योजनेसाठी महाप्रित ५ हजार कोटी निधी उभारणार
– बार्टीच्या त्या ७६३ विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा संपूर्ण लाभ
गृहनिर्माण विभाग
– मुंबई महानगरात रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजना झपाट्याने पूर्ण करणार
– विविध महामंडळे प्रकल्प राबविणार
उच्च व तंत्रशिक्षण
कोल्हापूरचे वारणा विद्यापीठ समूह विद्यापीठ
नगरविकास विभाग
कळंबोली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयासाठी भाडेपट्टा, सेवाशुल्क माफ
नगर विकास
चिपळूण, रामटेक, इचलकरंजी येथील जमिनीच्या आरक्षणात फेरबदल
महसूल विभाग
श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्या सरंजाम जमिनींना देण्यात आलेली सूट वंशपरंपरेने त्यांच्या वारसांना
वस्त्रोद्योग विभाग
पाचोर्यातील सहकारी सूत गिरणीस शासन अर्थसहाय
सहकार विभाग
सहकार भवनासाठी सायन येथील म्हाडाची जमीन