Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Dating App Fraud: डेटिंग अ‍ॅपवरील मैत्री ३३ लाखांना; प्रेमाचे नाटक करुन व्यावसायिकाला लुबाडले, नवी मुंबईतील प्रकार

9

म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : डेटिंग अ‍ॅपद्वारे एका अनोळखी महिलेसोबत मैत्री करणे घणसोलीत राहणाऱ्या एका व्यावसायिकाला महागात पडले आहे. या अ‍ॅपवरील महिलेने व्यावसायिकासोबत प्रेमाचे नाटक करून त्याच्याजवळचे तब्बल ३३ लाख ३७ हजार रुपये उकळून त्याची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी या प्रकरणातील अज्ञात महिलेविरोधात फसवणुकीसह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

काय आहे प्रकरण?

ट्रेडिंग व गार्मेंटचा व्यवसाय असणाऱ्या ५३ वर्षीय व्यावसायिकाने मोबाइलमध्ये ‘बबल’ नावाच्या डेटिंग अ‍ॅपवर सर्चिंग सुरू केले होते. त्यावेळी प्रगती दहिया नावाच्या महिलेसोबत त्याची ओळख झाली होती. त्यानंतर प्रगतीने अहमदाबाद येथे राहात असल्याचे भासवून व्यावसायिकासोबत मैत्री वाढवली. त्यानंतर तिने वडिलांचा करोनामध्ये मृत्यू झाल्यानंतर ती लहान भाऊ व बहिणीसोबत राहात असल्याचे सांगितले होते. तिच्या आईला वेळोवेळी दवाखान्यामध्ये दाखल करावे लागत असल्याचे तसेच, लहान भावंडाच्या शिक्षणाचा खर्चही तिलाच करावा लागत असल्याचे सांगून सहानुभूती मिळवली. त्यानंतर तिने मुंबईमध्ये नोकरी करण्यासाठी येणार असल्याचा बहाणा केला. त्यानंतर तिने या व्यावसायिकासोबत प्रेमाचे नाटक सुरू केले. हा व्यावसायिक प्रगतीच्या जाळ्यात फसल्यानंतर तिने आईला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगून तिला दवाखान्यातून घरी घेऊन जाण्यासाठी १० ते १५ हजार रुपये कमी पडत असल्याचे सांगितले. तसेच, त्याच्याकडे पैशांची मदत मागून मुंबईत नोकरी लागल्यांनतर हे पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे या व्यावसायिकाने तिला पैसे पाठवले. त्यानंतरही प्रगतीने वेगवेगळी कारणे सांगून या व्यावसायिकाला पैसे पाठवण्यास भाग पाडले.

Raj Thackeray : लोकांना हाताला काम हवं आहे, नुसते पैसे नको, लाडकी बहिण योजनेवरून राज ठाकरेंची राज्य सरकारवर टीका
अशा पद्धतीने या व्यावसायिकाने १० मार्च ते ३० जून या कालावधीत प्रगतीला तब्बल ३३ लाख ३७ हजार रुपये पाठवून दिले. त्यानंतर या व्यावसायिकाने जुलै महिन्यामध्ये प्रगतीला मुंबईत कधी येणार, याबाबत विचारणा केली असता, ती सतत घरात कोणीतरी आजारी असल्याचे तसेच धार्मिक कारणे, कौटुंबिक व आर्थिक कारणे सांगून मुंबईला येण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर प्रेमाचे नाटक करून प्रगती पैसे उकळत असल्याचे लक्षात आल्यानंतर या व्यावसायिकाने मध्य प्रदेश व गुजरातमध्ये जाऊन ज्या खात्यात पैसे पाठवले, त्या बँकेत जाऊन चौकशी केली, मात्र त्याच्या हाती काहीच लागले नाही. अखेर त्याने शुक्रवारी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.