Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Mumbai News: शाळकरी मुलीला थांबवलं अन् लाथा बुक्क्यांनी बेदम मारलं, मुंबईतील मुलींच्या ‘गँग’ची गुंडगिरी
एनडीटिव्हीच्या वृत्तानुसार, हा व्हायरल व्हिडीओ दोन आठडवड्यांपूर्वीचा आहे. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे मुलींचा एक गट एका मुलीला लाथाबुक्क्यांनी निर्दयीपणे मारत आहेत आणि शिवीगाळ देखील करत आहेत. मुलगी जमिनीवर पडली तरी त्या मारायच्या काही थांबत नाहीत. यातच धक्कादायक बाब म्हणजे मारणाऱ्या मुलींसह पीडित मुलगी देखील अल्पवयीन आहे.
पीडित मुलीसोबत भररस्त्यात हा प्रकार घडल्यानंतर ती आपलं डोकं पकडून आपल्या मैत्रिणीकडे जात असते तेवढ्यात हल्लेखोर मुलींपैकी् एक तिच्यावर जोरात ओरडते आणि तिला ‘इधर आ (इकडे ये)’ म्हणून शिवीगाळ करुन दम भरताना पाहायला मिळते. तर दुसरी मुलगी देखील ओरडते की, ‘पाण्यामध्ये टाका हिला’. हा प्रकार घडला तेव्हा कोणीही त्या रस्त्यावरुन जाताना दिसत नाही. यातच मात्र स्कूटरवरील काही व्यक्ती हे दृश्य पाहण्यासाठी थांबले होते.
इतक्यात त्यांनी त्या मुलीला पुन्हा आपल्या कचाट्यात पकडले. आणि पुन्हा लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरु केली. व्हिडीओ मध्ये दिसत आहे की, मुलीला रागाने फरफटत तिच्या पाठीवर चढून तिला जमिनीवर दामटवले गेले आणि बेदमपणे मारायला सुरुवात केली. एवढ्यात तेथे एक मुलगा आला आणि त्याने त्या मुलीला या मुलींच्या कचाट्यातून सोडवले.
वर्सोवा पोलीस स्टेशनने या प्रकाराची दखल घेतली असून पोलीस आणि स्नेहा फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी बाल कल्याण समितीच्या मदतीने सर्व हल्लेखोर मुली आणि अल्पवयीन मुली आणि त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले आहे. तर संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांनाही या घटनेची माहिती देण्यात आली आहे. हा व्हिडिओ कोणी प्रसारित केला याचा तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच या परिस्थितीवर निर्भया पथक बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे, असे देखील पोलिसांनी सांगितले.
व्हि़डिओवर नेटकऱ्यांनी अनेक लोकांनी कमेंट करत संताप व्यक्त केला आहे. मारहाण होत असताना काही तरुण बाजूला उभे असातनाही शाळकरी मुलीच्या मदतीला कोणी आलं नाही, यावर नाराजी देखील व्यक्त केली आहे. तर पोलिसांकडे तक्रार करुनही फायदाच काय, कारण पोलीस तर त्या मुलींनाही ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगतील आणि सोडून देतील, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.