Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

मराठी दिग्दर्शिकेच्या घरी चोरी, पाईपवरुन चोरटा सहाव्या मजल्यावर, जावयाच्या खोलीत शिरुन…

8

मुंबई : मराठी चित्रपट दिग्दर्शिका स्वप्ना जोशी यांच्या अंधेरी पश्चिम येथील सहाव्या मजल्यावरील थ्री बीएचके फ्लॅटमध्ये एका चोरट्याने फिल्मी पद्धतीने एन्ट्री केली. टी-शर्ट आणि शॉर्ट्स परिधान केलेल्या चोराने ड्रेनेज पाईप चढून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. रविवारी पहाटे ३.१० ते ३.३० वाजताच्या दरम्यान फ्रेंच विंडो उघडून तो हॉलमध्ये शिरला.

चोरटा घरातील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. जोशी यांची पाळीव मांजर सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसते. आधी तो किचनमध्ये जातो, नंतर बेडरूमचा दरवाजा उघडतो आणि डोकावून पाहतो. आत दिग्दर्शिकेची वृद्ध आई बेडवर झोपली आहे; तर केअरटेकर जमिनीवर पहुडली आहे. त्यानंतर तो पुढच्या बेडरूममध्ये प्रवेश करतो, जिथे दिग्दर्शिका झोपली होती, परंतु तिच्या खोलीत कुत्रा दिसल्याने तो मागे हटतो.

शेवटी तो स्वयंपाकघरात फेरी मारतो, देवघरात एक नजर टाकतो आणि तिसऱ्या बेडरूममध्ये जातो. तिथे दिग्दर्शिकेची मुलगी आणि तिचा नवरा झोपलेले असतात. तिथे, त्याला एक पर्स सापडते. त्यातून तो सहा हजार रुपये काढतो, परंतु लॅपटॉपकडे दुर्लक्ष करतो. ‘कदाचित पाईपवरुन खाली सरकताना लॅपटॉपचा अडथळा होण्याचा विचार त्याच्या डोक्यात आला असेल’ असं दिग्दर्शिकेने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितलं.
Ashish Shelar Fake Voice : मी आशिष शेलार बोलतोय! ‘असा’ काढला खोटा आवाज, मुंबईकरांची आर्थिक फसवणूक
या खोलीतील दुसऱ्या मांजरीने जावई देवेनला सावध केलं. काही सेकंदात त्याला याची जाणीव झाली आणि तो “चोर-चोर” ओरडत चोराचा पाठलाग करु लागला. त्याला पकडणार इतक्यात त्याने त्वरेने त्याच पाईपने खालची वाट धरली. दिग्दर्शिका स्वप्ना जोशी यांनी आंबोली पोलिसात तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चित्रपट दिग्दर्शिका स्वप्ना जोशी यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की, चोराने हल्ला केला असता, तर काय झाले असते, या भयंकर विचाराने त्या अजूनही थरथरत आहेत. मी अजूनही धक्क्यातून सावरलेले नाही. अजूनही माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्याचा भास होतो, काही अनोळखी व्यक्ती अजूनही घराभोवती लपून बसल्या असाव्यात, अशी कल्पना मनाला शिवत असल्याचंही त्या म्हणाल्या.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.