Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मागील दोन आठवड्यांपूर्वी पुण्यात संपन्न झालेल्या भाजपच्या अधिवेशनात शीर्षस्थ नेते अप्रत्यक्ष शरद पवारांवर शरसंधान करीत बेंबीच्या देठापासून टीका करीत होते. महायुतीला सत्तेपासून रोखणारा वाटेतील खरा अडसर तर शरद पवार हेच आहेत, हे भाजपला चांगलेच माहिती आहे.
मी काय म्हातारा झालोय का? असे शरद पवार काही महिन्यांपूर्वी पुन्हा एकदा म्हणाले होते. लोकसभेच्या निवडणुकीत संपूर्ण पक्ष फुटल्यानंतर एकाकी पडलेल्या शरद पवारांनी ज्या पद्धतीने जोरदार कमबॅक केले, त्यामुळे संपूर्ण देशात त्यांच्या लढवय्येपणाची पुन्हा जोरदार चर्चा झाली. त्यापेक्षाही महत्त्वाची बाब म्हणजे पुन्हा पक्षाला उभारी देण्याचे व पक्ष कार्यकर्त्यांत जीव ओतण्याचे काम शरद पवारांनी केल्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर आता कार्यकर्त्यांनी विधानसभेला आपली शस्त्रे परजली आहेत.
‘ओल्ड मॅन इज अगेन इन वॉर!’
एकूणच आता ‘ओल्ड मॅन इज अगेन इन वॉर’ अशाच भूमिकेत शरद पवार आहेत. विधानसभेसाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. लोकसभेची तयारी जशी त्यांनी बारामतीपासून केली, तशी विधानसभेचीही तयारी त्यांनी बारामतीतूनच सुरू केली आहे.
महत्वाची गोष्ट म्हणजे सर्वसामान्य लोक हीच शरद पवारांची ताकद आणि उर्जा आहे. आताही तेच चित्र दिसू लागले आहे. त्यामुळेच लोकांची खरी नाळ ओळखणाऱ्या शरद पवारांच्या चेहऱ्यावरील तेज या लोकसभेच्या निवडणुकीपासून पुन्हा वाढले आहे आणि शरद पवार यांचा आत्मविश्वासदेखील…!
शरद पवार यांनी लोकसभेच्या निवडणुकीतील प्रचाराची दिशा पहिल्याच दिवशी दाखवून अनंतकुमार हेगडे या कर्नाटकातील भाजप नेत्याला लक्ष्य केले होते. संविधानाच्या मुद्द्यावर त्यांनी केलेली सुरूवात मग साऱ्या देशातील विरोधी पक्षांनी प्रचाराचा मुख्य मुद्दा बनवला आणि मोदींसहीत भाजपची त्रेधातिरपीट उडवली. त्याचा परिणाम थेट लोकसभेच्या निकालातही दिसून आला.
शरद पवार यांचे राजकारणातील पर्व संपले आहे, असे वक्तव्य पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि फडणवीसांचा सत्ताभिषेक राजकारणाचा कथित परिघ संपलेल्या शरद पवारांनी लांबवला. फक्त लांबवलाच नाही, तर कोणी कल्पनाही न केलेली आघाडी तयार करून सत्तेत आणली. त्यानिमित्ताने एक वेगळेच राजकीय समीकरण त्यांनी देशासमोर आणले.
देवेंद्र फडणवीसांनंतर सख्खे पुतणे व ज्यांच्या हातात सारा पक्षाचा कारभार दिला होता, त्या अजित पवार यांनी शरद पवारांच्या वयाचा व निवृत्तीचा विषय अनेकदा जाहीर सभांतून बोलून दाखवला आणि सहकाऱ्यांच्या मदतीने स्वतंत्र सवतासुभा थाटत थेट पक्ष ताब्यात घेतला. त्यातून शरद पवार काही काळ एकाकी पडले, मात्र तेथून पुढे मात्र शरद पवार यांनी जी उभारी घेतली, त्याला तोड नाही. आता तर शरद पवार यांनी भाजपला सवाल विचारला, जबाबही दिला, तो भाजपच्याच स्टाईलमध्ये..! म्हणूनच सध्या शरद पवारांचा हा नवा चेहरा लोकही उत्सुकतेने वाचू लागले आहेत!