Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

‘आयर्नमॅन’ दिग्विजय पाटील यांनी इतिहास रचला, खडतर शर्यत पूर्ण करणारे पहिले भारतीय राजदूत

11

जळगाव : भारतीय परराष्ट्र सेवातील (IFS) अधिकारी दिग्विजय पाटील इतिहास रचला आहे. कझाकस्तानमध्ये भारतीय दूतावासात द्वितीय सचिव म्हणून कार्यरत असलेल्या दिग्विजय पाटील यांनी १८ ऑगस्ट रोजी जर्मनी इथे झालेली आयर्नमॅन शर्यत पूर्ण करत मोठं यश मिळवलं आहे. आयर्नमॅन रेस पूर्ण करणारे ते प्रथम IFS अधिकारी ठरले आहेत.

काय असते आयर्नमॅन शर्यत?

आयर्नमॅन फ्रँकफर्ट ही जगातील सर्वात प्रतिष्ठित आणि आव्हानात्मक ट्रायथलॉन स्पर्धांपैकी एक शर्यंत आहे. या शर्यतीत ३.८ किमी पोहणं, १८० किमी सायकलिंग आणि ४२.२ किमी मॅरेथॉनमध्ये पळणं अशा गोष्टी असतात. १५ तासांमध्ये ही स्पर्धा पूर्ण करायची असते. दिग्विजय पाटील यांनी ही शर्यत १४ तास २२ मिनिटांत पूर्ण केली. या स्पर्धेवेळी वातावरणात अतिशय बदल होत होते. शर्यतीच्या दिवशी मुसळधार पाऊस झाल्याने पोहण्याचा भाग थंड, तर दुसरीकडे सायकलिंगचा भाग अतिशय खडतर झाला होता. अशा परिस्थितीतही दिग्विजय पाटील यांनी ही शर्यत पूर्ण करत इतिहास नोंदवला आहे.
Kolkata Nabanna Protest : विद्यार्थी रस्त्यावर, बॅरिकेट्स तोडले, पोलिसांवर दगडफेक; नबन्ना आंदोलनाला हिंसक वळण

कोण आहेत दिग्विजय पाटील?

दिग्विजय पाटील हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावचे रहिवासी आहेत. त्यांनी आयआयटी खरगपूरमधून अभियांत्रिकी पदवी घेतली आहे. वयाच्या २४व्या वर्षी त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) मध्ये प्रवेश केला. सध्या ते कझाकीस्तानमधील भारतीय दूतावासात द्वितीय सचिव म्हणून कार्यरत आहेत. कझाकीस्तानमध्ये ते भारत आणि कझाकस्तान या दोन देशांमधील राजकीय आणि आर्थिक संबंध सांभाळत आहेत.
Pakistan News : पाकिस्तानच्या हद्दीत ४६ मिनिटं होतं पंतप्रधान मोदींचं विमान, पाकमध्ये एकच चर्चा

कठीण स्पर्धा जिंकल्यानंतर काय म्हणाले पाटील?

आपल्या या प्रवासाबद्दल दिग्विजय पाटील यांनी बोलताना सांगितलं, की आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होणं हे माझं कित्येक वर्षांपासूनचं स्वप्न होतं. अशा कठीण परिस्थितीत हे यश मिळवणं अधिक अर्थपूर्ण वाटतं. माझा नेहमीच व्यावसायिक आणि वैयक्तिक अशा दोन्ही पातळ्यांवर यशस्वी होण्याचं उदिष्ट्य असतं. ही शर्यत, स्पर्धा केवळ माझं एकट्याचं यश नसून माझे प्रशिक्षक पंकज रावळू, कुटुंबीय, सहकारी आणि शुभचिंतकांचा एकत्रित विजय आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.