Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Maharashtra Politics: भाजपमध्ये या, सन्मान राखू; रोहित पवारांची साथ सोडणाऱ्या नेत्याला राम शिंदेंची खुली ऑफर
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवार किंवा त्यांचे पूत्र जय पवार हे निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. तर भाजपकडून राम शिंदे यांचा दावाही सुरवातीपासून कायम आहे. दुसरीकडे विद्यमान आमदार रोहित पवार यांना पाठोपाठ धक्के बसत आहेत. शिवसेना ठाकरे गटाने आधीच बंड पुकारले आहे. त्यानंतर काँग्रेसनेही ही जागा काँग्रेसकडे सोडण्याची मागणी करीत पवार यांना कर्जतऐवजी बारामतीतून उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. मनसेही मैदानात उतरण्याच्या तयारी आहे. या पार्श्वभूमीवर सुपारीबाज असा उल्लेख असलेले फलक मतदारसंघात झळकले. पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगवतात, तसे उमेदवारीसाठी कोणीही पुढे येत असल्याच्या आशयाचे फ्लेक्स झळकले आहेत.
हे सुरू असतानाच रोहित पवार यांचे खंदे समर्थक, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा प्रचार प्रमुखे मधुकर राळेभात यांनी पक्ष सोडत असल्याची घोषणा केली. त्यांनी म्हटले की, रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली. गेली ३० वर्ष मी शिवसेनेचं काम केले. त्यानंतर मी राष्ट्रवादीत प्रवेश केला. रोहित पवारांना निवडून आणण्यासाठी आम्ही जीवाचं रान केले. रोहित पवारांची काम करण्याची पद्धत आणि कार्यकर्त्यांसोबत जे वागणं आहे ते मला पसंत पडलं नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना दुय्यम वागणूक दिली. त्यामुळे मी पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, अशी टीका राळेभात यांनी केली.
आपण कोणत्या पक्षात जाणार हे राळेभात यांनी अद्याप स्पष्ट केलेले नाही. अशातच आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांनी राळेभात यांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली आहे. शिंदे यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार ) पक्षाचा कर्जत जामखेड विधानसभा प्रमुख व प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिल्यानंतर जेष्ठनेते प्रा मधुकर राळेभात यांनी भाजपात येण्याचे निमंत्रण देत आहे. जेष्ठ नेते प्रा मधुकर राळेभात यांनी दोन दिवसापुर्वी पत्रकार परिषद घेवुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. आमदार रोहित पवारांच्या हुकूमशाही विरोधात व कार्यपध्दतीवर सडकुन टीका केली होती.
या पार्श्वभूमीवर राळेभात यांना भारतीय जनता पार्टीत येण्याचे खुल निमंत्रण आहे. मधुकर राळेभात यांचा सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व सार्वजनिक क्षेत्रातील अनूभव खूप मोठा आहे. कायम सामाजिक कार्यात सक्रिय असलेले राळेभात यांनी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर, जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले. २००९ ची विधानसभा निवडणूक लढवली जामखेड तालुक्यात क्रमांक एकची मते मिळवली होती. भारतीय जनता पार्टीत आल्यास त्यांचा योग्य तो मान सन्मान राखला जाईल, असेही शिंदे म्हटले आहे.