Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दरम्यान, सदरचा खून हा चार दिवसांपूर्वी झालेल्या वादातून झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. अनिकेत याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. चौघा हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली असून त्यांच्या शोधासाठी शहर आणि एलसीबीची पथके रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मृत अनिकेत हिप्परकर याच्या वडिलांचे निधन झाल्याने त्याच्या आजीसोबत शहरातील जामवाडी परिसरात राहतो. हिप्परकर हा कब्बडीपटू असून तो यापूर्वी जिल्हा संघातून कब्बडी खेळला होता. हिप्परकर याचा काही दिवसांपासून कब्बडी खेळणाऱ्या त्याच्या मित्रांसोबत वाद झाला होता. या वादातून नेहमी त्यांच्यात खटके उडत होते.
आज मंगळवार २७ ऑगस्ट रोजी अनिकेत हा नेहमीप्रमाणे व्यायामाला जाण्यासाठी घरातून बॅग घेऊन निघाला. चालत जामवाडी परिसरातील मारगुबाई मंदिर जवळ तो आला असता दबा धरून बसलेल्या चौघा हल्लेखोरांनी हिप्परकर याच्यावर हल्ला चढवला. कोयत्याने अनिकेतच्या मानेवर आणि डोक्यात सपासप वार केले. कोयत्याने वार डोक्यात आणि मानेत खोल गेल्याने कोयते अडकून पडले. यावेळी अनिकेत हा रक्ताच्या थारोळ्यात पडताच तेथून हल्लेखोरांनी पलायन केले.
भरवस्तीत खुनाची घटना घडल्याने याठिकाणी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सांगली शहरचे संजय मोरे यांच्यासह पथकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. घटनास्थळी अनिकेतचा मोबाईल, बॅग पडली होती. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी सांगलीतील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. अनिकेतचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून अनिकेतच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला होता. दरम्यान, पोलिसांनी तातडीने संशयितांची नावे निष्पन्न करून त्यांच्या शोधासाठी पथके रवाना केली होती.