Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड शहराजवळ असलेल्या भरणे नाका जवळ महामार्गलगत एक पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन दोन्ही दरवाजे उघडे करून उभे असल्याचे दिसले आणि पोलिसांचा संशय बळावला. यावेळी पोलिसांना दिसलेले सगळे दृश्य हे धक्कादायक होते. याप्रकरणी तीन संशयकांना अटक करण्यात आली आहे.
पेट्रोलिंग करीत भरणे नाका येथे आले असता, रात्री २२.४५ वाजता गोवा मुंबई महामार्गावर भरणेनाका येथेही मोठी कारवाई करण्यात आली आहे. गस्तीपथकाला महामार्गाच्या डावे बाजूस रोडलगत एक पांढऱ्या रंगाचे चारचाकी वाहन दोन्ही दरवाजे उघडे करून उभे असल्याचे दिसले म्हणून सदर पथकाने वाहनाजवळ जावून खात्री केली. याचवेळी वाहनामध्ये चालकासह अन्य दोन इसम बसलेले व त्या दोघांच्या मांडीवर बॅग असल्याचे दिसून आले. वाहनातील इसमांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने, त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी प्रथम असमाधानकारक प्रकारे उडवाउडवीची उत्तरे दिली, त्याचे हालचालीवरून त्याचा अधिक संशय आल्याने, त्यांची व त्यांचेकडील चारचाकी वाहन व सामानाची झडती घेण्यात आली. त्यांचेकडील सॅकमध्ये गांजा सदृश्य अंमली पदार्थ असल्याचे स्पष्ट झाले.
यावेळी या तीन संशयीतांची नाव गावाची चौकशी केली असता त्यांनी आपली नावे १) उदयसिह मदनसिंह चुंडावत, वय ३७ वर्षे, रा. पाटरोड, आदर्शनगर, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी, २) विशाल विद्याधर कोकाटे, वय ३४ वर्षे, रा. पोस्ट ऑफीस बिल्डींग, मंडणगड, ता. मंडणगड, जि. रत्नागिरी, ३) सिध्देश उदय गुजर, वय ३२ वर्षे, रा. पाटरोड, आदर्शनगर, मंडणगड ता. मंडणगड जि. रत्नागिरी असे असल्याचे सांगितले आहे. सदर आरोपीविरुद्ध खेड पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, अधिक तपास खेड पोलीस ठाणे करीत आहेत.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी रत्नागिरी व अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली जनार्दन परबकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा रत्नागिरी, पो.नि.श्री. नितीन भोयर, पो.ऊ नि. येवले खेड पोलीस ठाणे, सपोफी प्रशांत बोरकर, पोहवा सुभाष भागणे, शांताराम झोरे, बाळू पालकर, अतुल कांबळे रत्नागिरी, पोशि वैभव ओहोळ, खेड पोलीस ठाणे या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा या कारवाई पथकात समावेश होता. या प्रकरणी अधिक तपास खेड पोलीस करत आहेत.