Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हर्षवर्धन पाटील यांच्याशी आमचे कौटुंबीक संबंध
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ”वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आजवर कोणत्याच पक्षाने कोणतेही राजकारण आणले नाही. या ठिकाणी अनेक वर्ष हर्षवर्धन भाऊ आणि पवार साहेब एकत्र कार्यरत आहेत. यामध्ये कोणतेही राजकारण नाही. आमचे कौटुंबिक संबंध अतिशय चांगले आहेत. देशातील साखर कारखान्याचे ते प्रमुख आहेत. या संदर्भात हर्षवर्धन भाऊ आणि पवार साहेबांची भेट झाली असावी अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली.
व्हायरल क्लिपची सत्यता तपासली पाहिजे
जितेंद्र आव्हाड यांची एक वादग्रस्त व्हिडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. याबाबत सुळेंना विचारले असता त्या म्हणाल्या की, ”सदर व्हिडिओ क्लिप कधीची आहे ती ओरिजनल आहे का? कोणी त्यात नवीन डॉक्युमेंट केले आहे का? त्या व्हिडिओमध्ये काही छेडछाड केली आहे का? याची सत्यता पडताळली पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केले.
देवेंद्र फडणवीसांवर टीका
वाढत्या महिला अत्याचारांच्या संदर्भात बोलताना सुळे म्हणाल्या की, ”शक्ती कायदा हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडीने हा कायदा आणला होता. तो पुढे दिल्लीला पाठविला होता त्याचे पुढे काय झाले? महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत कुठे? आयत्यावेळी त्यांचे स्टेटमेंट दिल्लीवरून येतात. गृहमंत्री दिल्लीत असतात. महाराष्ट्र दिल्लीवरून चालतो हे दुर्दैव आहे”. असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील आणि शरद पवार हे एका कार्यक्रमात एकत्र होते. यावेळी दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. चर्चेनंतर हर्षवर्धन पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.