Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल, त्या पत्राची दखल घेतली असती तर…

7

रायगड (अमुलकुमार जैन): सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संबंधित जबाबदार दोन व्यक्तींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी दिली. याबाबतचा अधिक तपास मालवण पोलीस करत आहेत. मात्र छत्रपती संभाजी राजे यांनी १२ डिसेंबर २०२३ रोजी दिलेल्या पत्राची जर दखल घेतली असती, तर आज ही वेळ आली नसती.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट येथील किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची प्रतिष्ठापना ४ डिसेंबर २०२३ रोजी भारतीय नौदल दिनाचे औचित्य साधून करण्यात आले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान; स्मारक कोसळण्याच्या घटनेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, उद्घाटनाचा मला “शॉकच” होता

याबाबत छत्रपती संभाजी राजे यांनीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १२ डिसेंबर २०२३ रोजी पत्र लिहले होते. या पत्रात त्यांनी म्हटले होते की, राजकोट येथे आपण अनावरण केलेले शिल्प हे उत्तम शिल्पकलेच्या मान दंडात बसत नसल्याचे दिसून येत आहे. कित्येक आधुनिक साधने उपलब्ध असतानाही या शिल्पाची घडण प्रभावी व रेखीव दिसत नाही. अत्यंत कमी वेळात व घाईगडबडीत या शिल्पाचे काम केल्याचे दिसत आहे. मूर्तीच्या अनेक भागात कमतरता दिसून येतात मूर्तीचे हात, पाय व चेहरा यामध्ये प्रमाणबद्धता दिसत नाही. हेच शिल्प कायमस्वरूपी आहे की केवळ आपल्या हस्ते अनावरण कार्यक्रम पार पाडण्यासाठी बसवलेले तात्पुरते शिल्प आहे. नंतर या ठिकाणी चांगले शिल्प बसवले जाणार आहे. याचा उलगडा होत नाही, असे स्पष्टपणे त्यांनी आपल्या पत्रात म्हटले होते.भारत सरकारने या पत्राची कोणती दखल न घेतल्याने राजकोट येतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बाबत जी दुर्घटना घडली याला सर्वस्वी पंतप्रधान कार्यालय जबाबदार असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याने अंग झटकले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांनी २० ऑगस्ट २०२४ नौदलाचे कमांडर अभिषेक कारभारी यांना पाठवलेल्या लेखी पत्रात असे म्हटले आहे की, ४ डिसेंबर २०२३ रोजी सेनादिनानिमित्त मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्याचे बांधकाम करण्यात आले होते. त्या अनुषंगाने आपल्या मार्फत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला होता. जून महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची डागडुजी करण्यात आली होती, परंतु सद्यस्थितीत पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी आपण नट बोल्टचा वापर केला होता, त्या नट बोल्टला आता पावसामुळे व समुद्रकिनाऱ्यावरील खारे वारे यामुळे गंज पकडला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विद्रुप दिसत आहे. तसेच राजकोट किल्ल्यावर पर्यटकांची वर्दळ वर्षभर सुरू असते. याबाबात पर्यटक स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधी इत्यादींनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे आपल्या स्तरावरून संबंधित शिल्पकार यांना आदेश देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत तात्काळ कळविण्यात यावे, असे स्पष्टपणे म्हटले होते.

राज्याच्या सार्वजनिक बांधकाम उपविभाग मालवण यांनी पुतळ्या बाबत गंभीर घटना घडण्याचे संकेतच या माध्यमातून नौदलाच्या कमांडर अभिषेक कारभारी यांना तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक व कार्यकारी अभियंता कणकवली त्याचबरोबर तहसीलदार मालवण व पोलीस निरीक्षक मालवण यांना कळवले हो. तरी देखील पुतळ्याबाबत कोणत्याही विभागाने गांभीर्याने दखल घेतली नाही, हे यावरून स्पष्ट होते. यावरून राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाने ही जबाबदारी झटकून टाकल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.