Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Malvan Bandh : शिवरायांचा पुतळा कोसळल्याचा निषेध, मालवण बंदची हाक, ७० ते ८० टक्के दुकानदार सहभागी

10

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी उभारण्यात आलेला शिवरायांचा हा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी जवळपास २ वाजताच्या सुमारास कोसळला. ३६०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून दुसरीकडे विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं आहे. या सर्व प्रकरणात राजकीय वातावरण तापलं आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर याविरोधात आज बुधवारी मालवण बंदची हाक देण्यात आली आहे. बंदची हाक देत मालवणकरांकडून या घटनेचा निषेध केला जाणार आहे. या मालवण बंदमध्ये ७० ते ८० टक्के दुकानदार सहभागी होणार आहेत.
Shivaji Maharaj Statue Collapsed : शिल्पकार आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट दोघांवर गुन्हा दाखल, शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर मोठी कारवाई
महाराष्ट्रभरात महाविकास आघाडीकडूनही आंदोलन करण्यात येणार असून मविआ मालवणमध्येही जात निषेध व्यक्त करत आंदोलन करणार आहे. या आंदोलनात आदित्य ठाकरे, अंबादान दानवे, जयंत पाटील, विनायक राऊत, विजय वडेट्टीवार राजकोट किल्ल्यावर जात शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार आहे. त्यानंतर या नेत्यांकडून भरड नाका ते मालवण पोलीस स्टेशनपर्यंत निषेध मोर्चा काढला जाणार आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj Statue : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे नटबोल्ट गंजल्याचं पत्र नौदलाला आधीच दिलेलं, अपघातानंतर नवी माहिती समोर
छत्रपती शिवाजी महाराजांनी ३०० वर्षांपूर्वी बांधलेले गड-किल्ले आजही जराही हललेले नाहीत. ऊन, वारा, समुद्राच्या लाटा झेलणारे शिवाजी महाराजांनी बांधलेले हे गड-किल्ले आजही अभेद्द आहेत आणि त्यांचा पुतळा वाऱ्याने कोसळतो? अतिशय खराब सामग्रीने हा पुतळा बांधण्यात आला होता का? महाराजांचा पुतळा बांधताना इतका हलगर्जीपणा कसा केला जातो? असे अनेक संतप्त सवाल विरोधकांसह शिवप्रेमींमधूनही विचारले जात आहेत.

भारत देशाचे राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची सुरक्षितता विचारात घेत हा पूर्णाकृती पुतळा सुरक्षित आणि सुस्थितीत उभारण्याच्या दृष्टीने बनवणं आणि त्यासंदर्भात सर्वोतोपरी काळजी घेणं हे अतिशय महत्ताचं होतं. मात्र पुतळ्याच्या उभारणीकडे दुर्लक्ष करुन निकृष्ट दर्जाचा पुतळा उभारण्यात आला. याप्रकरणी पुतळ्याचे शिल्पकार आणि कन्सल्टंट या दोघांवर मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.