Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वसईतील मासेमारीच्या हंगामाला नारळी पौर्णिमेच्या नंतर खऱ्या अर्थाने सुरवात झाली होती. समुद्रात नारळ अर्पण केल्यानंतर मासेमारी बोटी मासेमारीसाठी नारळी पौर्णिमेच्या मुहूर्तावर समुद्रात नेण्याची प्रथा असते. त्यानुसार मच्छिमारांनी आपल्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी नुकताच उतरवल्या होत्या. त्या काही मच्छिमारांनी १५ ऑगस्ट या दिवशी बोटी नेल्या होत्या. मासेमारी बंदी कालावधी मध्ये सलग अडीच महिने हा व्यवसाय ठप्प असल्याने मच्छिमारांच्या हातचे काम गेले होते. त्यामुळे नव्या हंगामाच्या प्रतीक्षेत असताना पहिल्या हंगामाची सुरवात जोमाने झाली होती. पहिल्या फेरीमध्ये त्यांना मोठ्या प्रमाणावर आणि चांगली मासळी जाळ्यामध्ये मिळाल्याचे मच्छिमारांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्यात आनंदाचे वातावरण होते. मात्र पावसामुळे आणि वादळी वाऱ्यामुळे समुद्रात धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व बोटी किनाऱ्यावर विसावल्या आहेत. वसई -विरार मधील सर्वच बोटी या किनाऱ्यावर आल्या असून मासेमारी पूर्णतः पुन्हा एकदा ठप्प झाली आहे. त्यामुळे मच्छिमारांच्या आनंदावर विरजण पडले आहे.
मागील हंगामाच्या शेवटी आणि हिवाळ्यात मच्छिमारी बोटी समुद्र गेल्यानंतरही जाळ्यात मासळी मिळाली नव्हती. मासळी ऐवजी जेली फिश आणि कचरा मिळत होता. त्यामुळे यंदाचा हंगाम चांगला जाण्यासाठी आम्ही सज्ज झाले असतानाच पुन्हा एकदा मासेमारी बंद झाल्याची खंत वसईतील मच्छिमारांना आहे. यासह आता मागील ४ दिवसांपासून बोटी किनाऱ्यावर असून ३० ऑगस्ट पर्यंत किनाऱ्यावरच राहणार आहेत. तर पुढे वादळ कायम राहिले तर आणखीन काही दिवस मासेमारी बोटी किनार्यावरच राहण्याची शक्यता आहे. अशामध्ये मात्र वादळी वाऱ्यानंतर समुद्रात झालेल्या हालचालींमुळे मासळी घाबरून प्रवासोबत इतर ठिकाणी फेकली जाते. त्यामुळे समुद्रात मासळी दुष्काळ हा पडतो. या वादळानंतर देखील मासळी दुष्काळ पडण्याची भीती आम्हा मच्छिमारांमध्ये असल्याचे कोळी युवा शक्तीचे अध्यक्ष मिल्टन सौदीया यांनी सांगितले. त्यातच सध्या श्रावण महिना सुरु आहे. श्रावण महिना संपण्यासाठी अजूनही काही दिवसांचा कालावधी असून त्यानंतर पुन्हा गणेशोत्सव सुरु होणार आहे. त्यामुळे या दरम्यान देखील मासळीची मागणी कमी होण्याची शक्यता असून असे दुहेरी ओढवले असल्याचे मच्छिमारांनी म्हटले.
” मासेमारीच्या एका फेरीमागे ३० ते ४० हजारांचा खर्च येतो. हा सर्व खर्च करून मच्छिमार मासेमारी साठी सज्ज आहेत. मात्र वादळामुळे विसावा घेतला आहे. वादळानंतर अनेकदा मत्स्य दुष्काळ पडण्याची शक्यता असते. यंदा तो पडू नये अशी अपेक्षा आहे. ” – मिल्टन सौदीया , अध्यक्ष, कोळी युवा शक्ती संघटना.