Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Shivaji Maharaj Statue Collapsed: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. अकोला येथील आंदोलना दरम्यान आमदार अमोल मिटकरी यांनी आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी केली.
राज्यात महाराजांचे अनेक पुतळे 50 वर्षांपासून दिमाखात उभे आहेत. शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राची अस्मिता नाही अख्या जगाची अस्मिता आहे. आणि अशाप्रकारे महाराजांचा पुतळा तीन महिन्यात घाईघाईत का उभारला, असा सवाल अमोल मिटकरी यांनी केलाय. अजूनही तो आरोपी मोकाट आहे, असा आरोपही केलाय. आपटे यांनी तयार केलेल्या पुतळ्यामध्ये विडंबन आहे. महाराजांच्या भुवयांच्या वर खोप दाखवल्या गेली आहे. ती खोप का दाखवली हे स्पष्ट झालं पाहिजे आणि आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी मिटकरी यांनी केली आहे. यावेळी शाहीर अज्ञानदास यांच्या पोवाड्यातील प्रतापगडावरील किस्सा मिटकरी यांनी सांगितलाय. शिवाजी महाराजांच्या चारित्र्याचा विडंबनाचा खुलासा झाला, पाहिजे अशी मागणी सुद्धा मिटकरी यांनी केली आहे.
गृहखात्याला मिटकरी यांची विनंती
महाराष्ट्रच गृहखात सक्षम आहे. म्हणून तात्काळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आपटेला अटक करावी आणि देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, जे कोणी त्याला पाठीशी घालत असतील त्यांच्यावरही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी भूमिका शिवप्रेमी आणि राष्ट्रवादी काँग्रेसची असल्याचं मिटकरी यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्र शासनाने कोणालाही माफ करूनये अशी विनंती मिटकरींनी केली आहे.
Controversial Statement: दीपक केसरकर हे अफजलनाखानाची औलाद, बुटाने मारले पाहिजे-संजय राऊत
दीपक केसरकर यांच्या विधानावर मिटकरी काय म्हणाले
यावेळी मिटकरी यांनी दीपक केसरकर यांच्या विधानावरही ताशेरे ओढले आहे. जबाबदार पदावर असलेल्या मंत्र्यांनी शिवाजी महाराजांवर बोलताना दहावेळा विचार केला पाहिजे, असा सल्ला मिटकरी यांनी दिलाय.
Ajit Pawar Silent Protest: मालवण पुतळा प्रकरण:अजित पवारांच्या भूमिकेने राजकीय वर्तुळात चर्चा, सत्तेत असून करणार आंदोलन
पुतळा उभारण्यासाठी मिटकरी यांचा सरकारला सल्ला
शासनाने इतिहास संशोधकांची बैठक घेऊन शिवाजी महाराजांचा आरमाराने उभारलेला पुतळा कसा असावा याची चर्चा करावी, असा सल्ला देत जलजीरा आणि सिंधुदुर्ग किल्याचं उदाहरण दिल आहे.
NCP Protest: आपटेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा; अमोल मिटकरींचा सरकारला घरचा आहेर
मुख्यमंत्र्यांच्या विधानावर का असमाधानी
याबरोबरच मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर सुद्धा समाधानी नसल्याचं मिटकरी यांनी स्पष्ट केलंय. तशी 45 किलोमीटर वेगाने वारे वाहत होते, तर त्यावेळी घरावरील टिनपत्रे उडून जायला पाहिजे, झाडे कोसळायला पाहिजे तसं काहीच झालं नाही. तशी 45 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे हे वर्षा बंगल्याच्या भवती आणि राजपाल भवनाच्या भवती पण वाहतात, तिथं कुठलीच पडझड नाही, त्यामुळे असे असमाधान कारक उत्तरे देऊ नका असा सल्ला मुख्यमंत्र्यांना मिटकरी यांनी दिलाय. जे फरार आहेत त्यांना तात्काळ अटक करा आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी मिटकरी यांनी केलीय.