Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ट्रकने चिरडलं, आई रक्ताच्या थारोळ्यात, दोन वर्षांचा रुद्र रस्त्यात रडत बसलेला, इतक्यात…

11

Jalgaon Accident Child saved by doctor : रुद्र गंभीर जखमी अवस्थेत आईच्या देहाजवळ पडला होता. अनेक जण त्या ठिकाणाहून वाहने घेऊन जात होते, मात्र बघ्याची भूमिका अनेकांनी घेतली.

Jalgaon Accident : ट्रकने चिरडलं, आई रक्ताच्या थारोळ्यात, दोन वर्षांचा रुद्र रस्त्यात रडत बसलेला, इतक्यात…

निलेश पाटील, जळगाव : ट्रकखाली चिरडून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना जळगावात घडली आहे. या भीषण अपघातात शेजारी आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर दोन वर्षांचा रुद्र देखील गंभीर जखमी अवस्थेत तिच्या देहाजवळ पडला होता. अनेक जण त्या ठिकाणाहून वाहने घेऊन जात होते, मात्र बघ्याची भूमिका अनेकांनी घेतली. अखेर जखमी रुद्रला रुग्णालयात पोहोचवण्यासाठी पुढे आले ते डॉक्टर खैरनार. डॉक्टरी पेशाला जागून त्यांनी जखमी रुद्रला तात्काळ रुग्णालयात नेले.

जळगावातील खोटे नगरजवळ दुचाकी आणि ट्रकचा अपघात झाला. त्याच वेळी डॉक्टर चेतन खैरनार हे मायादेवी नगरकडील आपल्या घराकडे जात होते. अपघात झाल्याचे दिसताच त्यांनी आपली दुचाकी घटनास्थळी नेली. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर एक महिला आणि एका तरुणीचा मृत्यू झाल्याचे दिसून आले, तर दोन वर्षांचा चिमुरडा रुद्र जखमी अवस्थेत होता. रुद्रच्या कपाळाला जबर जखम झाल्यामुळे त्याला उचलण्याचं धाडस कोणत्याही नागरिकाकडे नव्हतं, मात्र गंभीर जखमी रुद्रला पाहताच डॉक्टरांनी तातडीने निर्णय घेतला.
Navi Mumbai Murder : सहकाऱ्याची गाडीत हत्या, बॉडी कर्नाळ्यात टाकली, संशय टाळण्यासाठी स्वतःच्या पायावर झाडलेली गोळी ठरली जीवघेणी
डॉक्टर चेतन खैरनार यांना रुद्र जखमी असल्याचे आढळले. त्यांनी कोणताही विचार न करता रुद्रला पोलिसांच्या गाडीमध्ये टाकून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. रुद्रला दुखापत झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे त्याच्यावर तातडीने उपचार होणे गरजेचे होते. डॉक्टर खैरनार यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे रुद्रला वेळेवर उपचार मिळाले, अन्यथा रुद्रचा देखील जीव गेला असता.
लिपीक महिलेकडे शरीरसुखाची मागणी, महापालिका अतिरिक्त आयुक्तांवर गुन्हा

मृतांचा चेहरा झाकण्यासाठी तरुणींनी दिल्या ओढण्या

दिक्षिता व पायल या दोघींच्या चेहऱ्यावरून ट्रक गेल्यामुळे दोघींच्या चेहऱ्याचा चेंदामेंदा झाला होता. प्रवीण वाघ या पोलीस कर्मचाऱ्याला दोघींच्या चेहऱ्यावर टाकण्यासाठी शेजारी काहीही न मिळाल्याने त्यांनी रस्त्यावरून जात असलेल्या मुलींकडून ओढण्या मागितल्या. त्या मुलींनीही क्षणाचाही विचार न करता आपल्या ओढण्या मृतदेहावर झाकण्यासाठी दिल्या. एकीकडे अपघात झाल्यानंतर मदत न करता मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यात दंग असणाऱ्यांची संख्या वाढली असताना काही जण मात्र या काळातही आपली माणुसकी जपताना दिसून आले हे या अपघातातून निष्पन्न झाले.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात १० वर्षांचा अनुभव… आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.