Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Nitesh Rane : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या मुद्द्यावर राजकरण तापले असताना आता नितेश राणे यांनी एक आक्रमक भाषण देत थेट पोलीसांना दम भरला आहे. तसेच विरोधकांना सुद्धा विशाळगडावरील अतिक्रमणावरुन टोला मारला आहे.
Aaditya Thackeray: दिशा सालियन प्रकरणात लहान मुलांचा रोल काय? आदित्य ठाकरेंना नितेश राणेंचा सवाल
पोलीसांची खुर्ची हिंदू धर्माच्या रक्षणासाठी वापरा
पोलीसांना दिलेली खुर्ची हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी वापरा. कुराण मध्ये फक्त हिंदूंचा कट्टरवाद आहे मग त्यावेळी पोलीस आहे की आणखी कोण आहे हे तो जिहादी पाहणार नाहीत. पोलिसांवर हल्ला करण्याऱ्या जिहादीला मदत करणार का? असा पलट सवाल नितेश राणे यांनी पोलिसांना केला आहे. कोणीही पोलीस अधिकारी वाकड्यात जात असेल तर जाऊ नको बाबा खरंच माझ्या वाकड्यात जाऊ नको सरकार कोणाचे आहे बघ, अशी थेट चेतावणी नितेश राणे यांनी दिली आहे.
पोलीसांनी वाकड्यात जावू नये, सरकार कोणाचे आहे बघावे; आमदार नितेश राणेंचा थेट अधिकाऱ्यांना दम
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावर काय म्हणाले राणे..
महाराजांच्या पुतळ्यावरून वेगळ्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे, पुतळा बनवणाऱ्या कलाकार आपटेला आम्ही पोलिसांनी सोडून दिले की नक्की आपटणार अशी भूमिका नितेश राणेंनी घेतली. विशाळगडावरील अतिक्रमणवर विरोधक शिवप्रेमी कधीच बोलले नाही. विशाळगडावर हिरव्या चादरी टाकत आहे. महाराजांच्या गड किल्ल्यांची काय अवस्था करून ठेवली आहे. सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या नेत्यांना विशाळगड वरील जिहाद्यांचे अतिक्रमण दिसले नाही का? सिंधुदुर्ग मध्ये गेलेल्या नेत्यांना विशाळगड वरील अतिक्रम दिसत नाहीत का? असा सवाल त्यांनी विरोधकांना केला. पुढे राणे म्हणाले विशाळगडावर बुलडोझर घेऊन जाऊ आणि जिहाद्यांची आतिक्रमणे काढून टाकू. आजपासून इस्लामपूर नव्हे तर ईश्र्वरपूर म्हणा, जो म्हणत नाही त्याला पाकिस्तान मध्ये पाठवा. देशाचे पंतप्रधान , राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, गृहमंत्री कडवे हिंदुत्ववादी आहेत. पोलिसांनी हे सगळे डायरीत हे लिहून ठेवा,म्हणजे तुम्हाला पुन्हा सूनवण्याची वेळ येणार नाही. आम्ही येत्या महिन्यात ईश्वरपूरचा जीआर घेऊन येतो, सरकार पातळीवर प्रकिया सुरु आहे अशी माहिती राणेंनी भाषणातून दिली.