Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

सप्टेंबरमध्ये वर्क ऑर्डर निघाली, डिसेंबरमध्ये पुतळ्याची उभारणी; धक्कादायक माहिती उघडकीस

9

Shivaji Maharaj Statue Collapse: नौदलानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामासाठी काढलेली वर्क ऑर्डर आता समोर आली आहे. त्यातून बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
सिंधुदुर्ग: मालवणात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंच गेल्या आठवड्यात कोसळला. विशेष म्हणजे हा पुतळा अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारण्यात आला होता. त्याचं अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं होतं. हा पुतळा कोसळल्यानं महायुती सरकारवर सर्वच स्तरातून टीका होत आहे. घाईघाईत निकृष्ट दर्जाचा पुतळा का उभारला, असा सवाल विचारला जात आहे. या पुतळ्यासाठी नौदलानं काढलेली वर्क ऑर्डर आता समोर आली आहे. त्यातून महत्त्वाचा तपशील उघड झाला आहे.

राज्य सरकारचं सार्वजनिक बांधकाम खातं आणि नौदल यांची पुतळा उभारणीत महत्त्वाची भूमिका होती. राजकोट परिसरात पुतळ्याची उभारणी करण्यात आली. त्यासाठीचा चौथरा सार्वजनिक बांधकाम विभागानं बांधला. त्यावर पुतळा उभारण्याची जबाबदारी नौदलाकडे होती. पुतळा उभारणी, निविदा प्रक्रिया राबवण्याचं काम नौदलाकडे होतं. पण यामध्ये अनेक त्रुटी असल्याचं आढळून आलं आहे.
Aaditya Thackeray vs Narayan Rane: वेगवेगळ्या वेळा ठरलेल्या, पण तरीही ठाकरे-राणे आमनेसामने; किल्ल्यावर नेमकं काय घडलं?
ज्या ठिकाणी पुतळा उभारण्यात आला, ती जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात आहे. पुतळ्यासाठी एकूण २ कोटी ४० लाख रुपये रक्कम खर्च करण्यात आली. ही रक्कम सार्वजनिक बांधकाम विभागानं नौदलाकडे वर्ग केली. पुतळ्यासाठीचा चबुतरा सार्वजनिक बांधकाम विभागानं उभारला. त्यावर प्रत्यक्ष पुतळा बसवण्याची जबाबदारी नौदलानं पार पाडली.
राणे-ठाकरे समर्थक भिडले; जयंत पाटलांकडून मध्यस्थीचा प्रयत्न; पण एका मागणीनं परिस्थिती चिघळली
पुतळ्यासंदर्भात नौदलानं ८ सप्टेंबर २०२३ रोजी वर्क ऑर्डर काढली. ३५ फुटांचा पुतळा उभारण्यासाठी साधारणत: ३ वर्षांचा कालावधी लागतो. विशेष म्हणजे पुतळा साकारणाऱ्या जयदीप आपटेनं सनातन प्रभातकडे व्यक्त केलेल्या मनोगतामध्येही ३ वर्षांचा कालावधी आहे. जरा जरी चूक झाली, तरी सगळं संपेल, अशी भीती आपटेनं मनोगतात व्यक्त केली होती.

Shivaji Maharaj Statue Collapse: सप्टेंबरमध्ये वर्क ऑर्डर निघाली, डिसेंबरमध्ये पुतळ्याची उभारणी; धक्कादायक माहिती उघडकीस

पुतळा उभारण्यासाठी ३ वर्षांचा कालावधी गरजेचा असताना प्रत्यक्षात आपटेनं ३ महिन्यांत पुतळा उभा केला. धक्कादायक बाब म्हणजे कला संचलनालयानं ६ फूट उंच पुतळा उभारण्यासाठी परवानगी दिलेली होती. पण प्रत्यक्षात मात्र नौदलानं ३५ फूट उंच पुतळ्यासाठी वर्क ऑर्डर काढली. त्यामुळे पुतळ्यासाठी राबवण्यात आलेल्या प्रक्रियेचा पायाच कच्चा असल्याचं समोर आलं आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.