Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Housing Projects : सर्वसामान्यांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, येत्या एक वर्षात राज्यात १ लाख घरे देणार असल्याची माहिती मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे.
Navi Mumbai Murder : सहकाऱ्याची गाडीत हत्या, बॉडी कर्नाळ्यात टाकली, संशय टाळण्यासाठी स्वतःच्या पायावर झाडलेली गोळी ठरली जीवघेणी
मंत्री श्री. सावे म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना, शबरी घरकुल योजना, मोदी आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना या घरकुल योजनांची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलच्या सदस्यांनी सहकार्य करावे. राज्य शासनाने महिलांना गृहखरेदीमध्ये १ टक्के मुद्रांक शुल्क सवलत जाहीर केलेली आहे. याचा रिअल इस्टेट उद्योगाला अप्रत्यक्षपणे मोठा फायदा होणार आहे. मुद्रांक शुल्क अर्ज प्रक्रियेचे डिजिटायझेन करण्याचा शासनाचा मानस असल्याचे मंत्री श्री. सावे यांनी यावेळी सांगितले.
गुडन्यूज! सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न होणार पूर्ण, गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंची मोठी घोषणा
राज्यात येत्या वर्षभरात १ लाख घरे देण्याचा आपला संकल्प आहे. प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे, असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. आगामी काळात राज्य शासनाच्या माध्यमातून गिरणी कामगारांसाठी सुमारे दीड लाख घरे बांधण्यात येणार आहेत. यासोबतच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३ कोटी घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे. राज्यात पुढील पाच वर्षांत ३५ लाख घरे बांधण्याचे उद्दीष्ट ठेवले असून त्यासाठी अर्थसंकल्पात ७४२५ कोटींची तरतूद केली आहे. यासाठी नरडेकोने पुढे यावे. आजच्या चर्चासत्राद्वारे केल्या जाणाऱ्या सूचनांचा नवीन गृहनिर्मण धोरणामध्ये समावेश करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करेल, असे मंत्री श्री.सावे म्हणाले.