Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शिल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर जखम का? मिटकरी मागोमाग आव्हाडांचा सवाल

17

Jitendra Awhad Tweet : महाराजांच्या कपाळावर जखम का दाखवली लोकप्रतिनिधींचा शिल्पकाराला प्रश्न, शिवरायांच्या पुतळ्यावरील डोळ्याच्या भुवईत खोक दाखवल्याने नवा वाद.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत जितेंद्र आव्हाड यांची सोशल मीडियावर पोस्ट
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : एकीकडे पुतळा प्रकरणावर राज्य सरकारला लक्ष्य केले जात असताना या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर सडकून टीका करण्यात येत आहे. छत्रपतींच्या पुतळ्याच्या डाव्या भुवईवर दाखविण्यात आलेल्या जखमेवरुन आता टीकाटीप्पणी सुरू झाली असून हे जाणीवपूर्वक दाखविण्यामागे काय हेतू आहे, असा प्रश्न आमदार अमोल मिटकरी यांनी विचारला आहे. तर या आपटेला आपटावासा वाटतोय, अशी संतप्त प्रतिक्रिया आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

छत्रपतींचा पुतळा कोसळल्यापासून त्या शिल्पावर आणि शिल्पकारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. आता लोकप्रतिनिधींनीही त्यावर प्रश्न उपस्थित करत या शिल्पामधे शिवाजी महाराजांच्या कपाळावर जखम दाखविण्याचे कारण काय असे विचारले जात आहे. विधानपरिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी एक्सवर ट्विट करत, आपटे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईवर या शिल्पात खोक का दाखवली? काय या मागचा इतिहास? सर्व ठरवून केलंय का? की याच भरवशावर कंत्राट मिळवलं? जवाब तो देना पडेगा, अशी पोस्ट केली. आपटे यांनी ही जखम हेतूपुरस्सर दाखवल्याचेही मिटकरी यांनी अधोरेखित केले.
आपटे, महाराजांच्या भुवईवर वार का दाखवला? छुपा अजेंडा आहे का? म्हणूनच कंत्राट मिळालं का? मिटकरींचे सवाल

तर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत, महाराजांचा पुतळा उभारणारा जयदीप आपटे हा फेसबुकवर आपल्या एका मित्राशी माजल्यासारखा बोलतो. त्याचा मित्रही याच्यासारखा; पुतळ्याच्या डोक्यावर आठवणीची खूणही ठेवली आहेस, असे तो म्हणतो. त्यावर आपटे, “पुतळा बनवताना पूर्ण अभ्यास करावा लागतो.” असे सांगतो. जर आपटेने पुतळा साकारताना हाच अभ्यास केला असता तर महाराष्ट्राला अपमानित व्हावे लागले नसते. परंतु,दोन मित्रांमधील फेसबुकवरील चर्चा आणि त्यामध्ये महाराजांच्या डोक्यावरील खुणेचा उल्लेख करून ती दाखवणे… किळस येते ! या आपटेला आपटावासा वाटतोय, असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.

शिल्पामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपाळावर जखम का? मिटकरी मागोमाग आव्हाडांचा सवाल

तर अमोल मिटकरी यांनी सुद्धा सवाल केला आहे. ट्वीट करत मिटकरी म्हणाले, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी याने शिवाजी महाराजांवर दांडपट्ट्याने वार केला होता. त्यामध्ये महाराजांना छोटी इजा झाली होती. मात्र असा जखम असलेला पुतळा बनवून आपटेला काय सांगायचे होते? या संदर्भात त्याने सनातन प्रभातला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिलेल्या उत्तरावरून यात त्याचा काही छुपा अजेंडा होता का? असा प्रश्न मिटकरी यांनी विचारला.

प्रतीक्षा बनसोडे

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.