Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Mahayuti Government: ‘तुम्ही, दैवताचा अपमान केला; माफीने हा प्रश्न सुटणार नाही, सत्तेतून बाहेर व्हा’
Maharashtra Politics: मालवणमधील राजकोट किल्ल्याजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी नाना पटोले हे विमानाने सायंकाळी नांदेड विमानतळावर आले होते. दरम्यान, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हयातील मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्यामुळे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे.
मालवण पुतळा प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माफी; विरोधकांना म्हणाले-तुमचे सहकार्य हवे, आपण सर्वांनी मिळून…
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी माफी मागीतली. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही माफी मागीतली. या घटनेवरून कोणीही राजकारण करू नये, असे म्हटले होते. यावर बोलताना नाना पटोले म्हणाले, तुम्ही कमीशन खाता, भ्रष्टाचार करत आहेत. त्याला काय म्हणाचे? त्याला राजकारण म्हणायचे की भ्रष्टाचार म्हणायचे कि कमिशन खोर म्हणायचे? महाजांची प्रतिमा ज्या पध्दतीने पडली त्याचे जगामध्ये छायाचित्र गेले. त्यामुळे महाराजांचा नाही तर, महाराष्ट्राच्या या देवेतेचा आपमान केला. त्याला माफीने सुटणार नाही.
BJP Mission: विधानसभेसाठीचे भाजपचे टार्गेट ठरले; लोकसभेच्या चूका टाळण्यासाठी आखली रणनिती, सोबत असणार संघाची साथ
या सरकारमध्ये थोडीशी तरी, जनाची नाही तर, मनाची ठेवून सत्ता सोडली पाहिजे. महाराजांचे पुतळे समुद्राच्या काठावर अनेक आहेत. गेटवे ऑफ इंडिया वरती आहेत. तो पुतळा अनेक वर्षाचा आहे, त्याला का भेग पडले नाही, त्याला का काही होतं नाही. आठ महिन्यात प्रतिमा पडत आहे, हे सर्व तुमचे पाप आहे. माफीने महाराष्ट्राच्या दैवताचा अवमान वपास येऊ शकतो असे त्यांना वाटत असेल तर, ते निर्लज्ज लोक आहेत, अशी टिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
Mahayuti Government: ‘तुम्ही, दैवताचा अपमान केला; माफीने हा प्रश्न सुटणार नाही, सत्तेतून बाहेर व्हा’
जागा वाटपाबाबत महाविकास आघाडीत वाद नाही
आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी २८८ जागवर लढणार आहे. सर्व जागेचे नियोजन करून निवडणूक लढणार आहोत. अद्याप जागा वाटपाचा निर्णय झालं नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. जागा वाटपावरून महाविकास आघाडीत वाद नसल्याचे पटोले म्हणाले.