Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पुराच्या पाण्यासोबत घरात शिरली मगर, नागरिकांची उडली भंबेरी! व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल

9

Crocodile enter in House : गुजरातमध्ये मागील काही दिवस पावसाची रिपरिप सुरु आहे. अनेक भागांमध्ये पावसामुळे परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच एका घरात चक्क मगर शिरल्याचा प्रकार घडला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
मुसळधार पावसामुळे गुजरातमध्ये घरात घुसली मगरी
मुंबई : पावसामुळे गुजरातचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरात पाणी शिरल्याने कुटुंब उघड्यावर पडली आहेत. इतकेच नव्हे तर अनेक ठिकाणी लोकांना स्थलांतर करण्यात आले आहे. पण काही भागात मगरींमुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. अशातच रिहाशी परिसरात मगरींची मात्र मोठी चिंता नागरिकांना सतावत आहे. सोशल मीडियावर मगरींचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मगरींचा वावर इतका वाढला आहे की लोक जीव मुठीत घेवून जगताना दिसत आहेत.

व्हिडिओत दिसणारी मगर अतिशय महाकाय आढळून येत आहे. मगरीला पाहून लोक सुद्धा चकित झाले आहेत. तिला पकडण्यासाठी काही नागरिक सापळा रचताना दिसत आहेत. मागील काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे समुद्रातील पाण्याचा स्तर वाढला आहे. अशामध्ये समुद्रातील जीव पाण्याच्या प्रवाहासोबत बाहेर येवू लागले आहेत. अनेक ठिकाणी पाणी वाढल्याने मगरी थेट मानवी वस्तीत शिरु लागल्या आहेत. हवामान खात्याने पुढील दोन ते तीन दिवस आणखी पाऊस कोसळेल असा अंदाज वर्तवला आहे.
Nandurbar Rain Update: जिल्ह्यात पावसामुळे तिघांचा मृत्यू, ४२ घरांची पडझड; अनेक गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत

पुराचे पाणी ओसरल्यानंतर वडोदरामधील रस्त्यांवर आणि घरांमध्ये मगरी आढळल्या.वडोदरा येथील मगरींना पकडण्यासाठी वन्यजीव अधिकारी अरविंद पवार यांनी नवभारत टाइम्स ऑनलाइनशी बोलताना सांगितले की, ‘आतापर्यंत पाच मगरींना पकडण्यात आले आहे.’ हेल्पलाइनवर सुमारे 200 कॉल्स आले आहेत.डभोई येथे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात एका मगरीचा मृत्यू झाला, तर उर्वरित चार जणांना वनविभागाच्या ताब्यात देण्यात आल्याचेही पवार यांनी नमूद केले.

पुराच्या पाण्यासोबत घरात शिरली मगर, नागरिकांची उडली भंबेरी! व्हिडिओ झाला सोशल मीडियावर व्हायरल

अरविंद पवार यांच्या म्हणण्यांनुसार सरपटणाऱ्या प्राण्यांना पाण्यात पकडणे ही मोठी आव्हाने होती, वडोदरामधील विविध सोसायट्यांकडून अनेक दृश्ये आणि अहवाल प्राप्त झाले आहेत, परंतु पाण्यात मगरींना पकडणे सोपे नाही. मगरी पाण्यात लपून बसतात, त्यामुळे बचाव पथकासाठी धोकादायक बनतात. पवार पुढे म्हणाले, “एमएस विद्यापीठातून एका १३ फुटाच्या मगरीची सुटका करण्यात आली.” पाऊस थांबल्याने पाणी तुंबलेल्या घरांमध्ये अडकलेल्या लोकांना काहीसा दिलासा मिळाला, पण मगरींनी त्यांच्या अडचणी वाढवल्या. अधिकाऱ्यांनी लोकांना मगरी दिसण्याची शक्यता असलेल्या भागात जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे.

प्रतीक्षा बनसोडे

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.