Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

BJP Mission: विधानसभेसाठीचे भाजपचे टार्गेट ठरले; लोकसभेच्या चूका टाळण्यासाठी आखली रणनिती, सोबत असणार संघाची साथ

11

Maharashtra Assembly Elections 2024: भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १२५ जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाटी भाजपने रणनिती आखली असून त्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची साथ असणार आहे.

महाराष्ट्र टाइम्स
म.टा. विशेष प्रतिनिधी

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने मिशन १२५ अर्थात सव्वाशे पार हाती घेतले असून त्यादृष्टीने रणनिती आखल्याचे समजते. विशेष म्हणजे या कामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही भाजपच्या हातात हात घालून कामाला लागण्याचे ठरवल्याचे समजते. हाती घेतलेले मिशन यशस्वी करण्यासाठी एक जिल्हा एक नेता याअंतर्गत प्रत्येक नेत्याकडे एका जिल्ह्याची जवाबदारी देण्यात येणार असल्याचे समजते.

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा पराभव भाजपच्या नेत्यांना जिव्हारी लागलेला असून लोकसभा निवडणुकीतील चूका टाळत आगामी विधानसभा निवडणुकीत जोरदार यश मिळविण्यासाठी राज्यातील भाजपने कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये काहीसा शांत राहिलेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघही सर्व मरगळ झटकून विधानसभा निवडणुकीसाठी सक्रिय झालेला आहे. त्यांच्या मदतीने आगामी विधानसभेसाठी भाजपने मिशन ‘सव्वाशे पार’ हात घेतल्याच समजते. त्यादृष्टीने राज्यातील भाजपने विशेष रणनिती आखली असून त्यासाठी दिल्लीतील नेत्यांचेही मदत घेतली जाणार आहे.
Rajkot Fort Rada: राजकोट राड्या प्रकरणी ४२ जणांसह दीडशे अनोळखी कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल; नावे सांगण्यास पोलिसांचा नकार

भाजपने राज्यातील विधानसभा जांगाचा आढावा घेतला असून त्यानुसार त्यांच्या ५० ते ६० जागा सहजासहजी निवडून येणार आहेत. उर्वरीत ६० ते ६५ जागा निवडून आणण्यासाठी त्यांना विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे. त्यानुसार या जागांची जवाबदारी काही नेत्यांच्या खांद्यावर देण्यात येणार आहे. त्यानुसार एक जिल्हा एक नेता अशी रचना तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रत्येक नेत्याला याबाबतची जवाबदारी देण्यात येणार असून त्यावर थेट दिल्लीतून लक्ष ठेवले जाणार आहे. या नेत्याच्या सोबतीला संबंधित जिल्ह्यातील संघाच्या कार्यकर्त्यांची फळी मैदानात उतरणार आहे.
मालवण पुतळा प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माफी; विरोधकांना म्हणाले-तुमचे सहकार्य हवे, आपण सर्वांनी मिळून…

उमेदवारांना पुरसा प्रचाराला वेळ मिळावा यासाठी उमेदवारांची यादीही लवकर जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते. मुंबईतील विधानसभेच्या जागांसाठी भाजप उमेदवारांची यादी येत्या आठवड्याभरात निश्चित करण्यात येणार असल्याचे समजते. त्याचाच भाग म्हणून ३० ऑगस्टला मुंबईत भाजपची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रभारी भूपेंद्र यादव, केंद्रीय सह संघटनमंत्री शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

जयकृष्ण नायर

लेखकाबद्दलजयकृष्ण नायरजयकृष्ण नायर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. महाविद्यालयात युवा सकाळमधून त्यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. २००९ पासून ते ऑनलाइन पत्रकारीतेत आहेत. प्रहार, स्टार माझा, न्यूज १८ लोकमत अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. देश, विदेश आणि तंत्रज्ञान यासोबत क्रीडा विषयात त्यांची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.