Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

PM मोदींनी मुंबई दौऱ्यापूर्वीच राज्यातील जनतेची माफी मागावी, खासदार वर्षा गायकवाडांची मागणी

10

Varsha Gaikwad On PM Modi : छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी पंतप्रधानांनी जाहीर माफी मागावी काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची मागणी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम
पीएम मोदींनी राज्यातील जनतेची माफी मागावी वर्षा गायकवाडांची मागणी
म.टा.खास प्रतिनिधी, मुंबई : मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण पेटले आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मुंबईच्या दौऱ्यावर येत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवप्रेमींची आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेची माफी मागावी, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी केली आहे.

मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची दुदैवी घटना काही दिवसांपूर्वी घडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण झाले होते. दुदैवाने आठ महिन्यांत पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुंबई दौऱ्याला येण्यापूर्वीच राज्यातील शिवप्रेमी आणि महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे.
Bacchu Kadu : राजकोट किल्ल्यावर जाऊन पंतप्रधान मोदी, फडणवीसांनी उठाबशा काढाव्यात, बच्चू कडूंची टीका

मालवण येथील राजकोट किल्ल्यावर आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा कोसळल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली. या घटनेनंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात येत असल्याने या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

PM मोदींनी मुंबई दौऱ्यापूर्वीच राज्यातील जनतेची माफी मागावी, खासदार वर्षा गायकवाडांची मागणी

पीएम मोदींचा मुंबई दौरा कसा असेल?

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी मुंबई आणि पालघरच्या दौऱ्यावर येणार आहेत. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील बीकेसी येथील जीओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे सुरू असलेल्या ‘ग्लोबल फिनटेक फेस्ट’ला मोदी भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास ते पालघरला रवाना होणार असून, पालघर येथील सिडको ग्राऊंड येथे वाढवण बंदराच्या कामाचे भूमिपूजन करणार आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जवळपास ७६ हजार कोटी रुपये खर्च करून वाढवण बंदर प्रकल्प उभारला जाणार आहे. हे बंदर भारतातील सर्वांत मोठ्या खोल पाण्यातील बंदरांपैकी एक असणार आहे. या बंदराच्या कामाचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.

प्रतीक्षा बनसोडे

लेखकाबद्दलप्रतीक्षा बनसोडेपत्रकारिता क्षेत्रातील पाच वर्षाचा अनुभव आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सध्या डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी डीडी नॅशनल, लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये रिपोर्टर म्हणून काम केले आहे. झी २४ तासमध्ये डिजीटल टीममध्ये काम केलं आहे. राजकीय आणि सामजिक बातम्या लिहिण्याची आवड आहे…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.