Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Pune Vidhan Sabha: पुणे जिल्ह्यात दोन लाख मतदारांची वाढ; अंतिम मतदारयादी लवकरच होणार प्रसिद्ध

7

Pune Vidhan Sabha: जिल्ह्याची मतदारसंख्या ८६ लाख ४७ हजारापर्यंतच पोहोचली आहे. त्यामुळे दोन लाख सात हजारांपेक्षा अधिक मतदारांची वाढ झाली आहे.

महाराष्ट्र टाइम्स
vote AIe
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्ह्यात सहा ऑगस्टपासून राबविलेल्या मतदारनोंदणी अभियानादरम्यान झालेली मतदार नोंदणी आणि यापूर्वीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात आले आहेत. त्यानुसार, जिल्ह्याची अंतिम मतदारयादी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्याची मतदारसंख्या ८६ लाख ४७ हजारापर्यंतच पोहोचली आहे. त्यामुळे दोन लाख सात हजारांपेक्षा अधिक मतदारांची वाढ झाली आहे. यादीत महिलांपेक्षा पुरुष मतदारांची संख्या अधिक आढळली आहे. अंतिम मतदारयादी ही लवकरच जाहीर होणार आहे.

लोकसभा निवडणुकीत मतदारयादींमध्ये घोळ आढळल्याने राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा मतदारनोंदणी करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, २५ जून ते पाच ऑगस्ट, त्यानंतर सहा ते २० ऑगस्टपर्यंत नोंदणी अभियान राबविण्यात आले. मतदारांमध्ये केलेली जनजागृती, कॉलेज, सोसायट्या, शाळांमध्ये मतदारनोंदणीचे राबविलेली विशेष शिबिरे; तसेच अनेक मतदारांशी संपर्क करून त्यांची नव्याने मतदार यादीत नावे समाविष्ट करण्यात आली. या प्रयत्नांमुळे यादीत मतदारांची मोठ्या संख्येने वाढ झाल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

दोन लाख मतदारांची वाढ

२५ जुलैपासून ते पाच ऑगस्ट या सव्वा महिन्यात एक लाख एक हजार २८२ इतक्या मतदारांची भर पडली. त्यानंतर पुन्हा सहा ते २० ऑगस्टपर्यंतच्या मतदारनोंदणी मोहिमेनंतर बुधवारपर्यंत ८६ लाख ४७ हजार १७२पर्यंत मतदारसंख्या पोहोचली आहे. त्यामुळे जानेवारी ते ऑगस्टपर्यंत सुमारे आठ महिन्यांत दोन लाख सात हजार ४४३ इतक्या मतदारांची वाढ झाली आहे.

पुरुष मतदारांची संख्या वाढली

मतदारनोंदणी मोहिमेतील अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया संपुष्टात आली. त्यानुसार, अंतिम मतदारयादी तयार करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांत ४४ लाख ९१ हजार ६८ इतके पुरुष मतदार असून, त्या तुलनेत महिला मतदारांची संख्या ४१ लाख ५५ हजार ३३० इतकी आहे. पुरुषांच्या तुलनेत तीन लाख ३५ हजार ७३८ इतक्या महिला मतदारांची संख्या कमीच आहे.

चिंचवड, भोसरी, हडपसर आघाडीवरच

लोकसभा निवडणुकीच्या मतदारयादीपासून ते आतापर्यंत अंतिम मतदार यादीपर्यंत पुणे जिल्ह्यातील २१ मतदारसंघांमध्ये चिंचवडची मतदारसंख्या ही सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. चिंचवड हा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये समाविष्ट आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात वडगावशेरी हा मतदारसंघ सर्वाधिक मतदारसंख्येचा, तर बारामती मतदारसंघात खडकवासला मतदारसंघांने बाजी मारली आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील हडपसर मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदारसंख्या असल्याचे अंतिम मतदारयादीतून दिसून आले आहे.
Pune-Miraj Train Route: पुणे-मिरज रेल्वे मार्ग तयार, क्षमता मोठी मात्र गाड्यांची वानवा; खडतर प्रवास कायम
पुणे शहर जिल्ह्यातील अंतिम मतदारसंख्या
पुणे लोकसभा मतदारसंघ

वडगाव शेरी…………..४,८९,४९४
कोथरूड ……………….४,३१,६५१
पर्वती …………… ३,५४,०६२
शिवाजीनगर ………… २,८९,७६२
पुणे कँटोन्मेंट ………… २,९०,६९८
कसबा ………………२,८१,३००

मावळ लोकसभा मतदारसंघ
मावळ…………….३,७८, ८४४
चिंचवड …………६,४३,७६९
पिंपरी ……………..३,८३,८३४

शिरूर लोकसभा मतदारसंघ
भोसरी ………………५,८६,८९५
हडपसर ……………. ६,०८,१७४
जुन्नर ……………….३,२०,४७०
आंबेगाव ………….३,०९,२०६
खेड आळंदी…………३,६६,८७३
शिरूर …………..४,५५,५४०

बारामती लोकसभा मतदारसंघ

खडकवासला …………… ५,६१,९५५
दौंड ………………३,१३,११०
इंदापूर …………..३,३३,०३०
बारामती ………….३,७५,१५२
पुरंदर ……………४,५१,८००
भोर …………………..४,२१,५५३

Pune Vidhan Sabha: पुणे जिल्ह्यात दोन लाख मतदारांची वाढ; अंतिम मतदारयादी लवकरच होणार प्रसिद्ध

दृष्टीक्षेपात
मतदारसंख्याची वाढ

८३ लाख ३८ हजार ४४७

२५ एप्रिल रोजीची मतदारसंख्या
८४ लाख ३९ हजार ७२९

सहा ऑगस्टची मतदारसंख्या
८६ लाख ४७ हजार १७२

२८ ऑगस्टपर्यंत मतदारसंख्या
२ लाख ७ हजार ४४३

एकूण मतदारसंख्येत झालेली वाढ

पुणे शहर जिल्ह्यात सहा ऑगस्टपासून मतदारनोंदणी घेण्यात आली. त्यामध्ये मतदारनोंदणीबरोबर यापूर्वीचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात आले. त्यामुळे आतापर्यंत दोन लाख सात हजार मतदारांची वाढ झाली आहे. या संदर्भात अंतिम मतदार यादी लवकरच प्रसिद्ध होणार असून, त्यामध्ये काही मतदारसंख्या कमी जास्त होऊ शकते.- मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.