Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

खिडकीच्या ग्रीलला रुमाल बांधून गळफास, कोल्हापूरच्या STचालकाने कोकणात आयुष्य संपवलं

7

Ratnagiri ST Driver Suicide: अनिल दिवसे हे एसटी चालक सात आठ महिन्यांपूर्वीच राजापूर एसटी डेपोमध्ये चालक या पदावर रुजू झाले होते. त्यांची सेवा ही प्रामाणिकपणे सुरू होती अशी माहिती राजापूर एसटी डेपोतील काही सहकाऱ्यांनी दिली.

हायलाइट्स:

  • राजापूर एसटी डेपोतील चालकाची आत्महत्या
  • अनिल शिवाजी दिवसे असं चालकाचं नाव आहे
  • लोखंडी खिडकीच्या ग्रीलला रुमाल बांधून आत्महत्या
Lipi
राजापूर एसटी डेपो ड्रायव्हर आत्महत्या
रत्नागिरी : राज्यात आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढत चाललं आहे. अशीच एक दुर्दैवी आत्महत्येची घटना रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर एसटी डेपोत झाल्याने खळबळ उडाली आहे. डेपोत कार्यरत असणाऱ्या चालकाने ही आत्महत्या केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. राजापूर कुंभवडे वस्तीची एसटी घेऊन गेलेल्या चालकाने कुंभवडे येथे आत्महत्या केली आहे. अनिल शिवाजी दिवसे (वय ४१ रा. एस.टी.डेपो राजापूर) असं आत्महत्या केलेल्या एसटी चालकाचे नाव आहे. चालक अनिल दिवसे यांनी हे टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.अनिल दिवसे हे एसटी चालक सात आठ महिन्यांपूर्वीच राजापूर एसटी डेपोमध्ये चालक या पदावर रुजू झाले होते. त्यांची सेवा ही प्रामाणिकपणे सुरू होती अशी माहिती राजापूर एसटी डेपोतील काही सहकाऱ्यांनी दिली. राजापूर येथे आपल्या काही सहकाऱ्यांसोबत ते भाड्याने घेतलेल्या खोलीमध्ये राहत होते. अनिल दिवसे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील नागदेवाडी येथील होते. चालक अनिल दिवसे यांच्या मृत्यूमुळे राजापूर एसटी डेपो येथील कर्मचाऱ्यांकडूनही हळहळ व्यक्त केली जात आहे. हा सगळा प्रकार २७ ऑगस्ट २०२४ रोजी अकरा वाजेच्या दरम्यान ग्रामपंचायत कुंभवडे कार्यालयाच्या इमारतीजवळ असलेल्या निवारा शेडमध्ये घडला आहे. एसटी वाहक चालकांना निवाऱ्यासाठी बांधलेल्या रुमच्या बाहेर ग्रामपंचायतच्या इमारतीच्या लोखंडी खिडकीच्या ग्रीलला स्व:ताचा रुमालची गाठ बांधून गळफास लावून आत्महत्या या चालकाने केली आहे.
Sarah Rahanuma : मेल्यासारखं जगण्यापेक्षा….आदल्या रात्री फेसबुकवर पोस्ट, दुसऱ्या दिवशी तलावात बॉडी; महिला पत्रकाराच्या मृत्यूने खळबळ

चालकाने आत्महत्या केल्याचं कळताच सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. अनिल दिवसे यांच्या मृत्यूनंतर शासकीय रुग्णालयात शवाविच्छेदन केल्यावर हा मृतदेह कोल्हापूर येथून राजापूर येथे दाखल झालेल्या त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात काल देण्यात आला. राजापूर येथील नाटे सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला आहे. बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे २८ ऑगस्ट २०२४ रोजी संध्याकाळी उशिरा या सगळ्या प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

अनिल दिवसे यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा मोठा परिवार आहे. हे सगळे कुटुंब कोल्हापूर नागदेववाडी येथे राहते. तर अनिल दिवसे हे नोकरीनिमित्त राजापूर येथे वास्तव्यास होते. या सगळ्या प्रकारची नोंद राजापूर लाटे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास राजापूर नाटे पोलीस करत आहेत.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.