Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Maharashtra Shravan Queen 2024: नाशिकची गरिमा साळुंखे महाराष्ट्राची श्रावणक्वीन; बाईपणाच्या व्याख्येतून जिंकलं प्रेक्षकांचं मन

34

Maharashtra Shravan Queen 2024: १२ जणींपैकी नाशिकची गरिमा साळुंखे काकणभर सरस ठरली आणि संपूर्ण सभागृहात झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटात तिने २०२४ची महाराष्ट्राची श्रावणक्वीन होण्याचा मान पटकावला.

महाराष्ट्र टाइम्स
maharashtra shravan queen 2024
मुंबई : मागील आठ दिवस चाललेला रॅम्पवॉकचा सराव, सादरीकरणाच्या फेरीसाठी घेतलेली मेहनत, सौंदर्यासोबतच परीक्षकांच्या प्रश्नांना उत्तम उत्तरे देण्यासाठी सुरू असलेली बुद्धीची मशागत, यासोबतच महाअंतिम फेरीचे दडपण, या सर्व गोष्टींचा समुच्चय साधत ‘वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’, बेव्हरेज पार्टनर सोसायटी टी, असोसिएट पार्टनर तन्वी हर्बल, इंडियन ऑइल, रिजेन्सी ग्रुप, किंट्री आणि असूस, बँकिंग पार्टनर टीजेएसबी, कल्चरल पार्टनर महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीत बाराही सौंदर्यवतींनी प्रेक्षकांसह परीक्षकांची वाहवा मिळवली. या १२ जणींपैकी नाशिकची गरिमा साळुंखे काकणभर सरस ठरली आणि संपूर्ण सभागृहात झालेल्या टाळ्यांच्या कडकडाटात तिने २०२४ची महाराष्ट्राची श्रावणक्वीन होण्याचा मान पटकावला. पुण्याची भाविका अडसुळे प्रथम उपविजेती, तर नागपूरची अंशू ठाकरे दुसरी उपविजेती ठरली.

विलेपार्ले येथील ‘एनएमआयएमएस’ संस्थेच्या मुकेश पटेल सभागृहात गुरुवारी संध्याकाळी झालेल्या या रंगतदार महाअंतिम फेरीत गरिमा साळुंखे (नाशिक), आर्या जावडेकर (पुणे), अर्निका सकपाळ (मुंबई), मनस्विनी वाटाणे (नागपूर), संजना डोईफोडे (पुणे), सृष्टी सोनवने (नाशिक), मधुलिका करंडे (नागपूर), पूर्वा आढाव (मुंबई), श्वेता खानापुरे (नाशिक), भाविका अडसुळे (पुणे), माधुरी छत्तीसे (मुंबई) आणि अंशू ठाकरे (नागपूर) या १२ जणींनी रॅम्पवॉक, सादरीकरण आणि प्रश्नांच्या उत्तरांतून परीक्षक असलेल्या वैशाली सामंत, रवी जाधव, अमृता खानविलकर, गश्मीर महाजनी आणि लीना मोगरे यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग उभा केला. मात्र ‘बाईपण आनंद की, जबाबदारी?’ या प्रश्नाच्या लेखी उत्तराने ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन’च्या २०२४ च्या महाअंतिम फेरीच्या निकालावर शिक्कामोर्तब केले.
‘नो मीन्स नो’ हा विचार डोक्यात पक्का बसवला की… नवोदित अभिनेत्रींना महेश मांजरेकरांचा मोलाचा सल्ला
अभिनेता अभिजित खांडकेकर आणि अभिनेत्री श्रेया बुगडे यांनी अत्यंत हसतखेळत, मोकळ्याढाकळ्या शैलीत उत्स्फूर्तपणे सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळत संपूर्ण कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. याआधीच्या श्रावणक्वीन स्पर्धेतील स्पर्धक पुष्करा देवचक्के हिने गणेशवंदना सादर करत कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर गेल्या वर्षीची महाराष्ट्राची श्रावणक्वीन आलापिनी मिसाळ आणि क्षमा देशपांडे यांनी लावणीनृत्य आणि नुपूर जोशी व रिचा अग्निहोत्री यांनी विविध गाण्यांवर सादरीकरण करत कार्यक्रमात रंग भरला.

एका रात्रीत तुम्हाला यश मिळू शकतं,पण खरा संघर्ष… सिनेइंडस्ट्रीतल्या नवोदीत कलाकारांना सई ताम्हणकरचा खास सल्ला
सौंदर्यवतींचा सन्मान
तन्वी हर्बल प्रस्तुत ‘फ्रेश फेस’ : श्वेता खानापुरे
किंट्री प्रस्तुत ‘बेस्ट स्कीन’ : मधुलिका करंडे
‘बेस्ट हेअर’ : भाविका अडसुळे
टीजेएसबी प्रस्तुत ‘बेस्ट पर्सनॅलिटी’ : गरिमा साळुंखे
‘मिस ब्युटीफुल आईज’ : संजना डोईफोडे
रिजेन्सी प्रस्तुत ‘मिस टॅलेंटेड’ : पूर्वा आढाव
सोसायटी टी प्रस्तुत ‘मिस सोसायटी’ : अंशू ठाकरे
इंडियन ऑइल प्रस्तुत ‘बेस्ट कॅटवॉक’ : आर्या जावडेकर
वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत ‘बेस्ट स्माइल’ : मधुलिका करंडे
वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत ‘मिस फोटोजेनिक’ : पूर्वा आढाव

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.