Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

रक्ताचे कपडे, पायावर जखमा; वृद्ध महिलेची सिलेंडरने हत्या, कोकणातील त्या खुणाचं गूढ उकललं

23

Ratnagiri Crime News: संशयित आरोपी स्वप्निल खातू हा मुंबई येथे बीएसटीमध्ये नोकरीला आहे. तो सध्या गावी या महिलेच्या घराशेजारी (नांदगांव खुर्द, गोसावीवाडी, चिपळूण) येथे नवीन बंगल्याचे बांधकाम करत आहे.

हायलाइट्स:

  • ब्लूटूथ, पायावर जखमा, कपड्यावर पडलेले रक्ताचे डाग
  • रत्नागिरीत लागला मोठ्या खुनाचा छडा
  • रत्नागिरी पोलिसांनी काही तासात आवळल्या आरोपीच्या मुसक्या
Lipi
चिपळूण सिलेंडरने महिलेची हत्या
रत्नागिरी : चिपळूण तालुक्यात सावर्डेजवळ दहीहंडीच्या दिवशी एका ६९ वर्षीय ज्येष्ठ महिलेचा सिलेंडर डोक्यात घालून खून झाला होता. या घटनेनं अवघा जिल्हा हादरला होता. मात्र रत्नागिरी पोलिसांनी तपासाचे कौशल्य पणाला लावत अवघ्या २४ तासातच संशयित आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. “तू बेवडा आहेस” असं बोलल्यामुळे या रागातून राक्षसी कृत्य करत आपल्या आईच्या वयाच्या असलेल्या ६९ वर्षीय वृद्ध महिलेचा सिलेंडर डोक्यात घालून तिचा निर्दयीपणे खून केल्याची खळबळजनक घटना चिपळूण तालुक्यात सावर्डे नांदगाव येथे घडली होती. मुंबई बीएसटीत कामाला असलेला संशयित आरोपी स्वप्निल परशुराम खातू (वय ४६) याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याची रवानागी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत केली आहे.संशयित आरोपी स्वप्निल खातू हा मुंबई येथे बीएसटीमध्ये नोकरीला आहे. तो सध्या गावी या महिलेच्या घराशेजारी (नांदगांव खुर्द, गोसावीवाडी, चिपळूण) येथे नवीन बंगल्याचे बांधकाम करत आहे. मुंबई बीएसटीत कामाला असलेल्या संशयित स्वप्नील हा सध्या (गुरुकृपा को. ऑ. हाऊसिंग सोसायटी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, घाटकोपर पूर्व, मुंबई) येथे राहणारा आहे. त्याने या खुनाची कबुली दिली आहे.
NCP on Tanaji Sawant : कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी, बाहेर उलट्या; तानाजी सावंत यांचं विधान, अजितदादांच्या शिलेदाराचा टोकाचा सल्ला

या घटनेनंतर पोलिसांना त्याच्यावर संशय होता. संशयित स्वप्नील खातू हा सावर्डे येथे या महिलेच्या घराजवळच बंगल्याचे बांधकाम करत आहे. घटनास्थळी मिळालेला ब्लूटूथ, काही रक्ताचे मिळालेले कपडे, पायावर भाजलेल्या खुणा यावरून संशय बळावला. सुरुवातीला चौकशीत उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या स्वप्निल याला पोलीसखाक्या दाखवताच तो बोलता झाला. या आरोपीने आपण घरातील गॅस सिलेंडर डोक्यात घालून त्यांना जिवे ठार मारून त्यांचे अंगावरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची कबुली दिली आहे. अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पत्रकारांजवळ बोलताना दिली आहे.

नेमकं काय घडलं?

२७ ऑगस्ट रोजी रोजी सायंकाळी दुपारी साडेचार ते संध्याकाळी सातच्या दरम्यान नांदगाव खुर्द येथे पती दहीहंडी पाहण्यासाठी घराबाहेर गेले होते. यावेळी त्यांची पत्नी सुनीता या घरी एकटाच होत्या. घरात आल्यानंतर त्यांना हे धक्कादायक दृश्य दिसले. ७८ वर्षीय पोलीस दलातून निवृत्त असलेले परशुराम दाजी पवार यांना आपल्या पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पाहून मोठा धक्का बसला. गृहिणी असलेल्या ज्येष्ठ नागरिक सुनिता परशुराम पवार गृहिणी एकट्या घरी असल्याची संधी साधत डोक्यातील जुना राग काढण्यासाठी ही हत्या केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली. या गंभीर गुन्हयाचा तपास जलद गतीने होण्याकरता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी, सावर्डे पोलीस ठाणे, गुहागर पोलीस ठाणे आणि अलोरे शिरगांव पोलीस ठाणे यांची स्वतंत्र पथके तयार केली. गुन्ह्याची उकल करण्याबाबत तपास पथकांना योग्य मार्गदर्शन आणि सूचना दिल्या होत्या. यावरून दिवसभर तपासाची चक्र फिरली असल्याची त्यांनी माहिती दिली.

सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रदीप गमरे, मनिष कांबळे, आंबेरकर,कांबळे, घोसाळकर, कदम, जड्यार, जाधव, कदम, चोचे, मोहिते, गामरे, कान्हेरे, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे शेख, श्री.नार्वेकर, चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी चिपळूण येथील श्री.आरवट, आदावडे, देसाई, वागदकर, कदम, अलोरे शिरगांव पोलीस ठाण्याचे नाळे, गव्हाणे, गुहागर पोलीस ठाण्याचे वनगे, माने, श्वान पथकाचे श्री.सावंत, जाधव, घुगरे, मोबाईल फॉरेन्सिक पथकाचे क्षीरसागर, हातकर, दाभाडे या सगळ्या महिला पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस कॉन्स्टेबल, पोलीस शिपाई, पोलीस नाईक यांचा या तपास पथकात समावेश होता.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.